लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

फ्रान्स हा भारताच्या सर्वात विश्वासू आणि मैत्रीपूर्ण भागीदारांपैकी एक आहे : लोकसभा अध्यक्ष


नारी शक्ती वंदन अधिनियम भारताच्या महिला प्रणीत विकासाला प्रतिबिंबित करतो : लोकसभा अध्यक्ष

Posted On: 15 APR 2026 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 एप्रिल 2026

फ्रान्स हा भारताचा सर्वात विश्वासार्ह आणि मैत्रीपूर्ण भागीदारांपैकी एक आहे असे सांगत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज दोन्ही देशांमधील खोलवर रुजलेले आणि दीर्घकालीन संबंध अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यातील जिव्हाळ्याच्या वैयक्तिक संबंधांमुळे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत आणि दृढ होण्यास मोठी गती मिळाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

फ्रान्सच्या सिनेटच्या भारत-फ्रान्स आंतर-संसदीय मैत्री गटाच्या शिष्टमंडळाने आज संसद भवनात  बिर्ला यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांनी हे विचार व्यक्त केले.

फ्रान्सच्या संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व 36 टक्क्यांहून अधिक असल्याबद्दल प्रशंसा करताना बिर्ला यांनी, भारत देखील प्रशासनातील महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी सातत्यपूर्ण वैधानिक आणि संस्थात्मक प्रयत्न करत आहे यावर भर दिला. तळाच्या स्तरापर्यंत , विशेषतः पंचायती राज संस्थांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे त्यांनी समाधानाने नमूद केले.

बिर्ला यांनी शिष्टमंडळाला पुढे माहिती दिली की, नव्याने बांधलेल्या संसद भवनात संमत करण्यात आलेले पहिले विधेयक 'नारी शक्ती वंदन अधिनियम' हे होते, जे निवडून आलेल्या वैधानिक संस्थांमध्ये महिलांसाठी एक-तृतीयांश आरक्षणाची तरतूद करत आहे. हा ऐतिहासिक कायदा महिला-प्रणीत विकास आणि सर्वसमावेशक प्रशासनाप्रति भारताची ठाम वचनबद्धता दर्शवतो, असे त्यांनी अधोरेखित केले. 

भारत आणि फ्रान्स यांच्यातील राजनैतिक आणि संसदीय अशा दोन्ही स्तरांवरील नियमित आणि विधायक संवादाबद्दल बिर्ला यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी गेल्या वर्षी 'ऑपरेशन सिंदूर'नंतर भारतीय संसदीय शिष्टमंडळाच्या फ्रान्स भेटीची आठवण करून दिली आणि त्या काळात फ्रान्सने दहशतवादाच्या स्पष्ट शब्दांत केलेल्या निषेधाची प्रशंसा केली. त्यांनी फ्रेंच शिष्टमंडळाच्या सदस्यांचा सातत्यपूर्ण पाठिंबा आणि एकजुटीच्या भावनेबद्दल त्यांचे आभार मानले.

       
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2252297) अभ्यागत कक्ष : 20