संरक्षण मंत्रालय
नौदल कमांडर परिषद-2026 च्या पहिल्या आवृत्तीला नवी दिल्लीतील नौ सेना भवन येथे प्रारंभ
Posted On:
15 APR 2026 5:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2026
भारतीय नौदल कमांडर परिषद 01/2026 ला नौ सेना भवन येथे नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्या उद्घाटनपर भाषणाने सुरुवात झाली. यावेळी वरिष्ठ नौदल नेतृत्व, आउटस्टेशन ऑपरेशनल आणि एरिया कमांडर, तसेच कमांड मुख्यालय आणि नौदल मुख्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
नौदल प्रमुखांनी पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान ऊर्जा सुरक्षेसह भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्यात नौदलाने बजावलेली कामगिरी, मोहिमांचा वाढलेला वेग आणि वाढीव आंतर-सेवा समन्वयाची प्रशंसा केली. नौदल प्रमुखांनी लढाऊ सज्जतेवर निरंतर लक्ष केंद्रित करण्यावर आणि भविष्यासाठी सज्ज दल तयार करण्यासाठी उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर दिला.
नौदल प्रमुखांनी बदलत्या भू-सामरिक परिस्थितीत हिंद महासागर क्षेत्रात आणि त्यापलीकडे भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला, तसेच बहुपक्षीय आणि द्विपक्षीय सरावांमध्ये मित्र परदेशी देशांसोबत सक्रिय सहभागाद्वारे एकजूट आणि विश्वासार्ह दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले.
या परिषदेदरम्यान, एकजुटता , क्षमता वृद्धी (समुद्रावरील आणि जमिनीवरील), देखभाल आणि दुरुस्ती, बहु-क्षेत्रीय सुरक्षा पद्धती, प्रशिक्षण, परदेशी सहकार्य, मनुष्यबळ विषयक बाबी, नवोन्मेष व स्वदेशीकरण यांसारख्या प्रमुख मुद्द्यांसह परिचालनाच्या प्रमुख बाबींवर चर्चा करण्यात आली.
चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी बदलत्या भू-राजकीय परिस्थितीशी संबंधित बाबींवर नौदल कमांडरांना संबोधित केले तसेच त्यांच्याशी संवाद साधला. आर्थिक आणि तंत्रज्ञान घटकांसह युद्धाचे झपाट्याने बदलणारे स्वरूप लक्षात घेऊन नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी नौदलाला केले.
(3)6IN9.jpeg)
(3)Y1BA.jpeg)
(5)HN52.jpeg)
(4)AXWA.jpeg)
नेहा कुलकर्णी/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2252284)
अभ्यागत कक्ष : 18