पंतप्रधान कार्यालय
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल सम्राट चौधरी यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांचेही पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
15 APR 2026 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सम्राट चौधरी यांचे बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले.
पंतप्रधान म्हणाले की, सम्राट चौधरी यांची ऊर्जा, लोकसेवेप्रती असलेले समर्पण आणि तळापर्यंत कामाचा अनुभव राज्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली लोकांच्या आकांक्षा पूर्ण करत बिहार सर्वांगीण विकासाची नवी उंची गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला .
पंतप्रधानांनी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांचेही अभिनंदन केले.
त्यांचा तळाच्या स्तरापर्यंतचा अनुभव आणि लोककल्याणाप्रति वचनबद्धता बिहारच्या विकासाला नवी दिशा आणि गती देईल आणि राज्य सुशासन, पारदर्शकता आणि लोककल्याणात नवे मापदंड प्रस्थापित करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले;
“बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल सम्राट चौधरी जी यांचे खूप-खूप अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा ! त्यांची ऊर्जा, लोकसेवेप्रती समर्पण आणि तळाच्या स्तरापर्यंतचा अनुभव राज्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे . मला पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली लोकांच्या आकांक्षा पूर्ण करत बिहार सर्वांगीण विकासाची नवी उंची गाठेल .
@samrat4bjp”
“बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल विजय कुमार चौधरी आणि बिजेंद्र प्रसाद यादव यांचेही हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ! त्यांचा तळाच्या स्तरापर्यंतचा अनुभव आणि लोककल्याणाप्रति वचनबद्धता बिहारच्या विकासाला नवी दिशा आणि गती देईल असा मला पूर्ण विश्वास आहे. तसेच राज्य सुशासन, पारदर्शकता आणि लोककल्याणात नवे मापदंड प्रस्थापित करेल .
@VijayKChy”
निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2252277)
अभ्यागत कक्ष : 16
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam