पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सामायिक केली त्यांच्या उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश दौऱ्याची क्षणचित्रे
प्रविष्टि तिथि:
14 APR 2026 10:54PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 एप्रिल 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश दौऱ्याची क्षणचित्रे सामायिक केली आहेत.
एक्सवरील पोस्टच्या एका मालिकेत मोदी म्हणालेः
“सहारणपूरमध्ये मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या कुटुंबियांच्या खूप मोठ्या पाठिंब्याने आणि आशीर्वादाने एका नवीन ऊर्जेने भरून टाकले आहे.”
“देहरादूनमधील प्रसिद्ध जय माँ डाट काली मंदिरात दर्शन आणि पूजेचे भाग्य लाभले. देवी मातेकडे सर्व देशवासीयांच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यपूर्ण जीवनासाठी प्रार्थना केली.”
“उत्तर प्रदेशातील सहारणपूरमध्ये दिल्ली-देहरादून इकॉनॉमिक कॉरिडॉरवर बनवलेला वाईल्डलाईफ एलिव्हेटेड कॉरिडॉर पाहण्याची सुसंधी मिळाली. यामुळे वन्यजीवांची विनासायास ये-जा सुनिश्चित होण्यासोबतच पर्यटन आणि व्यापारासाठीही नवीन संधी निर्माण होतील.”
“देहरादूनमधील उत्तराखंडच्या माझ्या बंधू-भगिनींचा अभूतपूर्व जोम आणि उत्साह हे दर्शवतो की डबल इंजिन सरकारमध्ये होत असलेल्या वेगवान विकासामुळे ते किती आनंदी आहेत.”
“देहरादूनच्या कार्यक्रमात जनसामान्यांचा उत्साह आणि आकांक्षामुळे मी भारावून गेलो आहे.”
* * *
माधुरी पांगे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2252015)
आगंतुक पटल : 34
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam