भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

2026 च्या नैऋत्य मोसमी पावसाच्या हंगामासाठी दीर्घकालीन अंदाज

Posted On: 13 APR 2026 7:02PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 एप्रिल 2026

 

देशात 2026 मध्ये नैऋत्य मोसमी हंगामी (जून ते सप्टेंबर) पाऊस सामान्यपेक्षा कमी (दीर्घकालीन सरासरीच्या (LPA) 90-95%) राहण्याची दाट शक्यता आहे.

भारतीय हवामान विभाग  2003 पासून देशातल्या सरासरी नैऋत्य मोसमी हंगामी (जून-सप्टेंबर) पावसाचा कार्यात्मक दीर्घकालीन अंदाज दोन टप्प्यांत जारी करत आहे. पहिला अंदाज एप्रिलमध्ये दिला जातो आणि दुसरा किंवा अद्ययावत अंदाज मे महिन्याच्या अखेरीस दिला जातो.  

1. देशात 2026 मधल्या नैऋत्य मोसमी हंगामातल्या (जून-सप्टेंबर) पावसाचा अंदाज

बदलत्या आणि सांख्यिकीय अशा दोन्ही मॉडेल्सवर आधारित अंदाजानुसार, परिमाणवाचकदृष्ट्या मान्सूनचा हंगामी पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या 92% राहण्याची शक्यता आहे, यामध्ये ± 5% मॉडेल त्रुटी असू शकते. 1971-2020 या कालावधीसाठी देशात हंगामी पावसाची दीर्घकालीन सरासरी 87 सेमी आहे.

'सामान्यपेक्षा जास्त' आणि 'अत्यधिक' पावसाच्या श्रेणीची शक्यता त्यांच्या संबंधित हवामानशास्त्रीय संभाव्यतेपेक्षा कमी आहे. एकूणच, देशात नैऋत्य मान्सूनचा हंगामी पाऊस सामान्यपेक्षा कमी (एलपीएच्या 90–95%) राहण्याची दाट शक्यता आहे.

Category

Rainfall Range

(% of LPA)

Forecast Probability (%)

Climatological

Probability (%)

Deficient

< 90

35

16

Below Normal

90 - 95

31

17

Normal

96 -104

27

33

Above Normal

105-110

6

16

Excess

> 110

1

17

 

स्थानिक वितरणानुसार, ईशान्य, वायव्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या काही भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर देशाच्या अनेक भागांत सामान्यपेक्षा कमी हंगामी पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

2. विषुववृत्तीय प्रशांत आणि हिंदी महासागरातल्या समुद्राच्या पृष्ठभागाची तापमान (SST) स्थिती

सध्या, विषुववृत्तीय प्रशांत क्षेत्रामध्ये 'कमकुवत ला निन्या' सारखी स्थिती 'एन्सो-न्यूट्रल' (ENSO-neutral) स्थितीकडे वळत आहे. मात्र, उष्णकटिबंधीय प्रशांत क्षेत्रामधली काही वातावरणीय अभिसरण वैशिष्ट्ये अजूनही कमकुवत ला निन्या सारख्या स्थितीशी सुसंगत आहेत. मान्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टीम (MMCFS) च्या ताज्या अंदाजानुसार, एप्रिल ते जून 2026 च्या हंगामात एन्सो-न्यूट्रल स्थिती कायम राहण्याची दाट शक्यता आहे. मान्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टीम  नैऋत्य मान्सून हंगामात 'एल निनो' स्थिती विकसित होण्याचे संकेत देते.

सध्या, हिंदी महासागरात 'न्यूट्रल इंडियन ओशन डायपोल' (IOD) स्थिती आहे आणि ताज्या हवामान मॉडेल्सच्या अंदाजानुसार नैऋत्य मान्सून हंगामाच्या अखेरीस सकारात्मक स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे.  

3. उत्तर गोलार्धातला बर्फाच्छादित प्रदेश

गेल्या तीन महिन्यांत (जानेवारी ते मार्च 2026) उत्तर गोलार्धात बर्फाच्छादित प्रदेशाचे प्रमाण सामान्यपेक्षा किंचित कमी होते.

 

* * *

सुषमा काणे/निखिलेश चित्रे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2251665) अभ्यागत कक्ष : 49