वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी डॉ.माजिद बिन अब्दुल्ला अल कसाब यांच्याशी आभासी माध्यमातून साधला संवाद
भारत आणि सौदी अरेबियाने पश्चिम आशियातल्या बदलत्या परिस्थितीचा आढावा घेतला आणि पुरवठा साखळी अतूट ठेवायला प्राधान्य देण्याचा केला पुनरुच्चार
Posted On:
11 APR 2026 3:39PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आपले सौदी अरेबियातले समकक्ष, सौदी अरेबियाचे वाणिज्य मंत्री डॉ. माजिद बिन अब्दुल्ला अल कसाब यांच्याशी व्हर्च्युअल कॉलद्वारे संवाद साधला.
याप्रसंगी, अलीकडेच घोषित केलेली युद्धबंदी, या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता आणि सुरक्षिततेचा मार्ग मोकळा करेल अशी आशा गोयल यांनी व्यक्त केली. त्यांनी वाढलेले अडथळे आणि अस्थिरतेदरम्यान पुरवठा साखळीची लवचिकता कायम राखण्याच्या निर्धारावर ठाम राहिलेल्या सौदीच्या जनतेच्या अदम्य जिद्दीचे कौतुक केले. त्यांनी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान देशात झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि भारतीय समुदायाचे रक्षण करण्यासाठी सौदी अरेबियाने केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
जागतिक संघर्षाचा प्रादेशिक पुरवठा साखळीवर पडलेला ताण लक्षात घेता, सुरळीत व्यापार प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी समन्वित प्रयत्नांद्वारे लवकरात लवकर परिस्थिती सावरण्याच्या गरजेवर उभय पक्षांनी भर दिला. गोयल यांनी सौदी अरेबिया आणि आखाती क्षेत्रात निर्यातीला पाठबळ देण्यासाठी भारताने उचललेल्या पावलांवर प्रकाश टाकला.
दोन्ही मंत्र्यांनी द्विपक्षीय व्यापार बळकट करण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आणि भारत-जीसीसी मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींमध्ये लवकर प्रगती होईल अशी आशा व्यक्त केली.
या बैठकीत भारत-सौदी अरेबिया यांच्यातली आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या सामायिक वचनबद्धतेवर भर देण्यात आला.
***
राधिका अघोर/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2251139)
अभ्यागत कक्ष : 21