वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी बहारिनचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अब्दुल्ला बिन अदेल फखरो यांच्याशी साधला संवाद
भारत-बहारिन कडून स्थैर्य, पुरवठा साखळी लवचिकता आणि अधिक दृढ आर्थिक संबंधांवर भर
प्रविष्टि तिथि:
10 APR 2026 7:20PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी बहारिनचे उद्योग आणि वाणिज्य मंत्री अब्दुल्ला बिन अदेल फखरो यांच्याशी आभासी माध्यमातून संवाद साधला.
या संवादादरम्यान गोयल यांनी या क्षेत्रासाठी जाहीर करण्यात आलेल्या युद्धविरामाचे स्वागत केले आणि तो कायमस्वरूपी राहील अशी आशा व्यक्त केली. संघर्ष सुरू झाल्यापासून बहारिनसह या क्षेत्रातील देश त्यांना सामोरे जाव्या लागलेल्या अडथळ्यांमधून वेगाने सावरतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. त्यांनी या क्षेत्रात सागरी आणि इतर मार्गांनी होणारा व्यापार प्रवाह नियमित राहण्याची खात्री करण्याच्या गरजेवर भर दिला.
गोयल यांनी बहारिनशी भारताची एकजूट व्यक्त केली, अलिकडे बहारिनमधल्या महत्त्वाच्या प्रतिष्ठानांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध केला आणि सागरी सुरक्षेसह तिथल्या सुरक्षा आणि स्थैर्यासाठी आपल्या पाठिंब्याचा पुनरुच्चार केला.
गोयल यांनी भारतीय समुदायाला मिळालेल्या सहकार्याची प्रशंसा केली आणि भारतीय नागरिकांच्या कल्याणासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल बहारिनच्या प्राधिकाऱ्यांचे आभार मानले.
या बैठकीत सातत्यपूर्ण सहकार्य आणि निकटच्या संवादातून भारत-बहारिन आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला..
***
निलिमा चितळे/निखिलेश चित्रे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2251005)
आगंतुक पटल : 57