वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत आणि जीसीसी कडून प्रादेशिक स्थैर्य आणि पुरवठा साखळी लवचिकता राखण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार

Posted On: 10 APR 2026 7:22PM by PIB Mumbai

 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आखाती सहकार्य परिषद (जीसीसी) चे सरचिटणीस महामहीम जासेम मोहम्मद अल बुधैवी यांच्याशी आभासी पध्‍दतीने संवाद साधला.

बैठकीदरम्यान गोयल यांनी या क्षेत्रात जाहीर झालेली युद्धबंदी कायमस्वरूपी राहील आणि यामुळे शाश्वत शांतता आणि स्थैर्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा व्यक्त केली. मतभेद केवळ परस्पर संवादातूनच सोडवले जाऊ शकतात, या भारताच्या तत्त्वनिष्ठ भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

मंत्री गोयल यांनी भारत आणि जीसीसी यांच्या नागरिकांमधल्या दृढ परस्पर संबंधांची आठवण काढली. हे संबंध या क्षेत्रातील देशांसोबतच्या मजबूत आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांचा गाभा आहेत, असे त्यांनी सांगितले. जीसीसी एकसंध शक्ती म्हणून आपली भूमिका बजावत राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यांनी जीसीसी देशांशी भारताची एकजूट व्यक्त केली आणि आवश्यक अन्नपदार्थांच्या पुरवठा साखळीत येणाऱ्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी पाठिंबा दर्शवला. पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी आणि लवचिकता राखण्यासाठी पर्यायी मार्गांचा शोध घेण्याकरिता उचललेल्या पावलांचे त्यांनी कौतुक केले.

व्यापार प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी समन्वित प्रयत्नांच्या गरजेवर उभय पक्षांनी भर दिला.

या बैठकीत सहकार्य आणि परस्पर समर्थनाच्या भावनेतून भारत-जीसीसी आर्थिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला.

***

सुवर्णा बेडेकर/निखिलेश चित्रे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2250987) अभ्यागत कक्ष : 19