सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
राज्यांचे उत्पन्न आणि संबंधित सकल घटकांसाठी नवीन आधारभूत वर्ष (2022-2023)संबंधी आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे 8 ते 10 एप्रिल,2026 दरम्यान अखिल भारतीय कार्यशाळेचे आयोजन
Posted On:
07 APR 2026 5:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 एप्रिल 2026
सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने राष्ट्रीय लेखा आधारभूत वर्ष 2022–23 असे सुधारित केले आहे. अर्थव्यवस्थेची विद्यमान रचना अधिक अचूक प्रतिबिंबित करणे, त्यामध्ये अद्ययावत माहिती स्रोतांचा समावेश करणे आणि अनुमान पद्धतींना विकसित होत असलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांशी अनुरूप बनवणे,असे यामागील उद्दिष्ट्ये आहेत. राष्ट्रीय स्तरावरील स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी ) धर्तीवर,राज्ये/केंद्रशासित प्रदेशांद्वारे सकल राज्य देशांतर्गत उत्पादनाचे आधारभूत वर्ष देखील सुधारित केले जाईल. त्यामुळे राज्यांच्या आर्थिक कामगिरीचे अधिक अचूक, सुसंगत आणि तुलनात्मक अंदाज सुनिश्चित करता येतील.
राज्ये /केंद्रशासित प्रदेशांना राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेले बदल समजून घेण्यास मदत करण्यासाठी, राज्यांमध्ये संकलन पद्धतींचे प्रमाणीकरण करण्यासाठी, तसेच प्रादेशिक लेखा सांख्यिकीमध्ये सुसूत्रता , पारदर्शकता आणि तुलनात्मकता वाढवण्यासाठी, राज्ये /केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालयाच्या अधिकारी /कर्मचाऱ्यांसाठी नवीन आधारभूत वर्ष (2022-2023) सह राज्य उत्पन्न आणि संबंधित सकल घटकांवर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या ‘नॅशनल स्टॅटिस्टिक्स ऑफिस’ (एनएसओ) च्या नॅशनल अकाउंट्स डिव्हिजन (एनएडी) द्वारे एका विशेष कार्यशाळेचे आयोजन केले आहे. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथे 8 ते 10 एप्रिल,2026 दरम्यान ही कार्यशाळा होणार आहे .अर्थव्यवस्थेच्या सर्व संस्थात्मक आणि उद्योग क्षेत्रांसाठी 'ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट' (जीएसडीपी) च्या संकलनातील पद्धतीमध्ये केलेल्या बदलांवर आणि इतर मुद्द्यांवर या कार्यशाळेत सविस्तर चर्चा केली जाईल. याव्यतिरिक्त, राज्य/केंद्रशासित प्रदेशाद्वारे जिल्हा देशांतर्गत उत्पादनाच्या (डीडीपी ) संकलनासाठीच्या एकसमान मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यावरही चर्चा केली जाईल.
या कार्यशाळेचे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग आणि आंध्र प्रदेश नियोजन विभागाचे प्रधान सचिव पीयूष कुमार यांच्या उपस्थितीत 8 एप्रिल, 2026 रोजी उद्घाटन सत्र आयोजित केले जाईल. या तीन दिवसीय कार्यशाळेत सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे अर्थशास्त्र आणि सांख्यिकी संचालनालयाचे सुमारे 150 अधिकारी/कर्मचारी सहभागी होतील.
सुवर्णा बेडेकर/सुषमा काणे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2249775)
अभ्यागत कक्ष : 16