राष्ट्रपती कार्यालय
ईस्टरच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींच्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
04 APR 2026 9:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 एप्रिल 2026
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईस्टरच्या पूर्वसंध्येला सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या संदेशात राष्ट्रपती म्हणाल्या:
“ईस्टरच्या पावन प्रसंगी मी सर्व नागरिकांना, विशेषतः भारतात आणि परदेशात राहणाऱ्या ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा देते.
ईस्टर हा ख्रिस्ती धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. प्रभु येशू ख्रिस्त यांच्या पुनरुत्थानातून सत्य, प्रेम, करुणा, त्याग आणि क्षमा या मूल्यांचे पालन करण्याची प्रेरणा मिळते.
या प्रसंगी आपण सर्वांनी सौहार्द, शांतता आणि बंधुता वाढविण्याचा संकल्प करूया आणि अधिक चांगल्या भविष्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया.”
Please click here to see the President's message
* * *
शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2249049)
आगंतुक पटल : 62