विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते म्हैसुरु येथील सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर मधील बायोनेस्टचे उद्घाटन, खाद्यान्नाच्या स्टार्टअप्स वर लक्ष केंद्रीत

Posted On: 04 APR 2026 7:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 एप्रिल 2026

 

केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी केंद्रीय खाद्यान्न तंत्रज्ञान आणि संशोधन संस्थेतील (Central Food Technology & Research Institute",CFTRI)बिराक-बायोनेस्ट(BIRAC-BioNEST)या इनक्युबेशन सेंटरचे उदघाटन केले.तसेच यावेळी त्यांनी नवनवीन तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या खाद्यान्न उत्पादनांच्या प्रदर्शनाचा आढावा घेतला. संस्थेच्या इनक्युबेशन सेंटर प्रयोगशाळेतील संशोधन आणि त्यांचे व्यावसायिक उपयोग यांच्यात दुवा साधणारे एक प्रमुख व्यासपीठ म्हणून त्याला ओळख देणे हा या प्रदर्शनाचा प्रमुख उद्देश आहे.

या इनक्युबेशन केंद्रात अनेक सामायिक पायाभूत सुविधा करण्यात आल्या असून एक अत्याधुनिक केंद्र म्हणून हे डिझाइन केले आहे.हे बायोनेस्ट इनक्युबेशन सेंटर अन्न जैवप्रक्रिया आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील फूड स्टार्टअप्सना चालना देईल, प्रगत संशोधनांना समर्थन देईल, आधुनिक पध्दतीने प्रमाणीकरण आणि सुलभपणे नियंत्रण करण्यात मदत करेल, ज्यामुळे वैज्ञानिक परिकल्पनांचे बाजारपेठेतील उपयुक्त उपायांमध्ये रूपांतर करणे शक्य होईल, अशी अपेक्षा आहे.

मार्च 2026 पर्यंत, बायोनेस्ट सुविधेने 26 स्टार्टअप्सना पाठिंबा दिला आहे, ज्यामध्ये फिजिकल आणि हायब्रीड इन्क्युबेट्स तसेच ग्रॅज्युएटेड व्हेंचर्सचा समावेश आहे -त्यापैकी अनेकांनी आधीच आपल्या वस्तूंचे व्यापारी स्तरावर उत्पादन सुरू केले आहे आणि बाजारपेठेतील परिणामांशी सुसंगत असलेल्या नावीन्यपूर्णतेवर वाढता भर दर्शवत, इन्क्युबेटेड कंपन्यांनी एकत्रितपणे 12 पेटंट दाखल केले आहेत तसेच संशोधन प्रकाशनांमध्ये योगदान दिले आहे.

न्यूट्रास्युटिकल्स, प्रिसिजन फर्मेंटेशन, प्रोबायोटिक्स आणि पोस्टबायोटिक्स, क्रिस्पर-आधारित तंत्रज्ञान आणि बोटॅनिकल्स यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये हे स्टार्टअप्स कार्यरत असून अन्न आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रांचा उच्च-प्रतीचे उत्पादन, विज्ञान-आधारित  उत्पादनांकडे झुकलेला कल दर्शवितो. 

   

नवीन उद्योग सुरू करणे सोपे झाले असले तरी, तो टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने मूल्यवर्धन, बाजारपेठेत प्रवेश आणि उद्योगांशी अधिक घट्ट संबंध असणे आवश्यक झाले आहे, असे उद्योजक आणि संबंधितांशी संवाद साधताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद केले.त्यांनी संशोधन संस्था आणि खाजगी क्षेत्र यांनी एकमेकांसोबत अधिक सखोलपणे समन्वय साधण्याचे आवाहन केले आणि रेडी-टू-इट व कन्वीनियन्स फूड या विभागांसह, ग्राहकांच्या मागणीनुसार नवोन्मेष साधण्यावर भर दिला.

यावेळी चार सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आणि CFTRI मध्ये विकसित केलेल्या दोन उत्पादनांचे अनावरणही करण्यात आले, ज्यामुळे उद्योगासोबतचा सततचा सहभाग आणि अंतर्गत तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण यांचे संकेत मिळाले. नवकल्पनांचा विस्तार करण्यासाठी आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांशी (MSMEs) असलेले संबंध अधिक दृढ करण्यासाठी असे सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संस्थेच्या  पंचाहत्तराव्या वर्धापनदिनानिमित्त, संस्थेचा संशोधन वारसा आणि तांत्रिक योगदानाचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या प्रकाशनांचा एक संच प्रसिद्ध करण्यात आला, ज्यामध्ये एक कॉफी टेबल बुक, संशोधन आणि विकास कामगिरीचा संग्रह, एक छायाचित्र यात्रा आणि पारंपरिक पाककृतींचा संग्रह यांचा समावेश आहे. हा महत्त्वाचा टप्पा साजरा केल्याचे स्मरण म्हणून  एक टपाल तिकिट आणि चित्रपोस्टकार्ड यांचेही अनावरण यावेळी करण्यात आले.

 

* * *

शैलेश पाटील/संपदा पाटगांवकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2249032) अभ्यागत कक्ष : 13