पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांकडून 'मन की बात'च्या 132व्या भागातील आपल्या संवादाची झलक सामायिक

Posted On: 29 MAR 2026 3:03PM by PIB Mumbai

 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  'मन की बात' च्या 132 व्या भागातील आपल्या संवादाची झलक सामायिक केली.
'एक्स' या समाज माध्यमांवरच्या संदेश मालिकेत मोदी म्हणाले,
"140 कोटी नागरिकांच्या ताकदीतून भारत सध्याच्या युद्धग्रस्त परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या संकटाला ठामपणे सामोरे जात आहे. पू्र्वीप्रमाणेच एकजुटीने आपण या कठीण आव्हानातून पूर्णपणे बाहेर पडू."
#मनकी बात

 "आज सर्वदूर योगाभ्यासाविषयी वाढणारी आवड पाहून आनंद वाटतो. निरोगी/सुदृढ राहाण्यासंदर्भातील हा माझा देशवासियांना आग्रह..."
#मनकी बात
"देशाच्या कानाकोपऱ्यात, लोक ज्या पद्धतीने पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेचा लाभ घेत आहेत, तो उत्साहवर्धक आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेशापासून राजस्थान आणि त्रिपुरा पर्यंतची उदाहरणे, यामुळे लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच आयुष्यही सुलभ होत असल्याचं दिसत आहे."
#मनकी बात
"त्रिपुरापासून छत्तीसगड आणि तेलंगणापर्यंत जलसंरक्षणातील प्रत्येक प्रयत्न प्रत्येकासाठी एक आदर्श ठरतो आहे. लोकसहभाग असलेल्या या अभियानातून केवळ पाण्याची समस्या दूर झाली नाही तर आजारही कमी झाले."
#मनकी बात
"जर तुम्हाला संस्कृती आणि हस्तलिखिते यांच्याविषयी आस्था असेल तर ज्ञान भारतम् सर्वेक्षणामध्ये तुम्ही नक्कीच सहभाग नोंदवला पाहिजे."
अरुणाचल प्रदेश, लेह, पंजाब आणि राजस्थान या राज्यांच्या या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख.
#मनकी बात
"माय भारत चमूचा बजेट क्वेस्ट हा उत्कृष्ट उपक्रम होता. आपल्या युवा शक्तीने लिहिलेल्या काही  निबंधांतून राष्ट्र निर्माणाबाबत त्यांची तळमळ दिसून येते. "
#मनकी बात
" जम्मू काश्मीरच्या संघाने रणजी विश्वचषक स्पर्धेत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. याचा जम्मू आणि काश्मीरमध्ये अत्यंत सकारात्मक परिणाम होऊन अनेकांना त्यातून क्रीडा क्षेत्रात कारकीर्द घडवण्याची प्रेरणा मिळेल."
#मनकी बात
"आजच्या #मनकी बात दरम्यान, तळागाळापर्यंत विज्ञान लोकप्रिय कऱण्याचा उद्देश बाळगणाऱ्या अन्वेषण या उपक्रमाचे कौतुक केले."
@PrayogaIER”
"नागा समुदायाने, परंपरांचे जतन कसे करावे आणि त्याच वेळी आपला दृष्टीकोन कसा भविष्यवेधी असू शकतो, हे दाखवून दिले आहे."
#मनकी बात
भारताला मच्छिमारांचा अभिमान वाटतो. ओडिशा, लक्षद्वीप आणि कर्नाटक येथील, आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीत कसे योगदान देतो हे दर्शवणाऱ्या अशा उपक्रमांना अधोरेखित केले.
#मनकी बात
वाराणसी, उत्तर प्रदेश आणि नागालँड इथले उपक्रम, ‘निसर्गाची जपणूक’ हा आपल्या संस्कृतीचाच अविभाज्य भाग असल्याचे अधोरेखित करतात.
#मनकी बात

***

राधिका अघोर/विजयालक्ष्मी साळवी-साने/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2246661) अभ्यागत कक्ष : 13