पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित शेअर करत मागितले माता महागौरीचे आशीर्वाद

प्रविष्टि तिथि: 26 MAR 2026 8:13AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माता महागौरीच्या दैवी चरणांना वंदन करून तिचे आशीर्वाद मागितले आहेत. तिच्या दिव्य तेजाने सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य नांदो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

पंतप्रधानांनी यासाठी पुढील संस्कृत श्लोक शेअर केला आहे-

“श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः। महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा॥”

एक्स समाज माध्यमावर लिहिलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात ;

“माता महागौरीच्या चरणी कोटी-कोटी प्रणाम! तिची दिव्य आभा प्रत्येकाच्या जीवनात सुख-समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो.

श्वेते वृषे समारूढा श्वेताम्बरधरा शुचिः।

महागौरी शुभं दद्यान्महादेवप्रमोददा॥”

“ अंबा मातेवर भक्तांची अढळ श्रद्धा असते. मातेबद्दल असणाऱ्या या श्रद्धा आणि भक्तीच्या भावनेमुळे त्यांचे मनोबल कधीही कमी होत नाही.”   

***

NehaKulkarni / ManjiriGanoo / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2245536) आगंतुक पटल : 58
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Bengali-TR , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam