पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जैवविविधता संवर्धन व नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन क्षेत्रात अल्पकालीन इंटर्नशिप कार्यक्रम सुरू

Posted On: 25 MAR 2026 3:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 मार्च 2026

 

राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना जैवविविधतेच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतानाच प्रत्यक्ष अनुभवांवर आधारित प्रकल्पाधारित शिक्षण घेण्यासाठी अल्पकालीन इंटर्नशीप कार्यक्रम सुरु केला आहे. या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन महिन्यांचा असेल.

युवा वर्गाची क्षमता वाढावी, पर्यावरणाबाबतची जाणीव जागृती सखोल व्हावी आणि त्यातून जैवविविधतेचे संवर्धन आणि नैसर्गीक संसाधनांचे व्यवस्थापन या क्षेत्रांमधील रोजगारांच्या संधींमध्ये वाढ व्हावी आणि त्यातून त्यांना जेवविविधतेचे राजदूत म्हणून विकसित व्हावे यादृष्टीने हा शिक्षण उपक्रम आखला आहे.

राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाकडून बीएसआयपी म्हणजे समरक्षण आंतर्वासिता अभ्यासक्रमसुद्धा नियमित तत्वावर चालवला जातो, ज्याचा कालावधी आता पुढील दोन महिन्यांसाठी वाढवला आहे. सध्याचे वर्ष हे बीएसआयपी चे सहावे वर्ष असून त्यामध्ये 24 बीएसआयपी आंतर्वासिता उमेदवारांची निवड झाली आहे आणि त्यांना विविध राज्यांच्या तसेच केंद्रशासित प्रदेशातील जैवविविधता मंडळांवर (SBBs/UTBC) नेमणूका मिळाल्या आहेत. त्यातून त्यांना जैवविविधतेसंबधी प्रत्यक्ष कामातून शिकता येते तसेच संबधित राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशातल्या जैवविविधता मंडळांच्या कामात सहकार्य देता येते.

या वर्षभर चालणाऱ्या कार्यक्रमात, या प्रशिक्षणार्थीना SBBs/UTBCच्या नियमित उपक्रमांसोबतच बैठकांंमध्ये भाग घेता येतो, कार्यक्रम आखता येतात, क्षेत्र अभ्यास आखता येतात. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण यातील विषयात अधिक स्वारस्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी दोन वर्षे आंतर्वासिता कालावधी वाढवण्याची संधी देते त्यातून जैवविविधता संवर्धनाबाबतचे ज्ञान आणि कौशल्य वाढवण्याची संधी त्यांना मिळते. 

प्रत्यक्ष सहभागातून प्रशिक्षित तरुण व्यावसायिकांचा चमू तयार करण्यासाठी पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालय, राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्या सक्रिय भागीदारीतून एक वर्षाचा बीएसआयपी हा नियमित कार्यक्रम सुरू करण्यात आला. अखिल भारतीय स्पर्धा प्रक्रियेतून निवडलेले प्रशिक्षणार्थी, जैवविविधता संवर्धन उपक्रमांना पाठिंबा देण्यासाठी आणि राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मंडळांना सहकार्य करण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तैनात केले जातात.

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन 2020 च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांनी 22 मे 2020 रोजी बीएसआयपी उपक्रमाच्या पहि्ल्या वर्गाचे उद्घाटन केले. या प्रशिक्षणार्थींना सहाय्य म्हणून राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण सध्या अंदाजे एक कोटी रुपये गुंतवत आहे, म्हणजेच मजबूत राष्ट्र उभारणीसाठी आणि भविष्यातील जैवविविधतेच्या राजदूतांचा शक्तीशाली चमू विकसित करण्यासाठी योगदान देत आहे. 

 

* * *

नितीन फुल्लुके/विजया सहजराव/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2245016) अभ्यागत कक्ष : 11