केंद्रीय लोकसेवा आयोग
यूपीएससी परीक्षेमध्ये पारदर्शकता
प्रविष्टि तिथि:
23 MAR 2026 4:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2026
सर्वोच्च न्यायालयाच्या रिट याचिका (C) क्रमांक 118/2024 मधील निकालाचे अनुपालन करून, केंद्रीय लोकसेवा आयोगाने(UPSC) प्राथमिक परीक्षा आयोजित केल्यानंतर आपल्या अधिकृत संकेतस्थळावर तात्पुरती उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. ही नवीन प्रक्रिया नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा 2026 पासून आणि त्यानंतर UPSC द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या सर्व संरचित परीक्षांसाठी लागू केली जाईल. प्राथमिक परीक्षेचे गुण मात्र संपूर्ण परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच प्रसिद्ध केले जातील.
सर्व पर्यायी विषयांमध्ये उमेदवारांना समान संधी मिळावी हे सुनिश्चित करण्यासाठी, यूपीएससी 'इंटर-सब्जेक्ट मॉडरेशन' पद्धतीचा अवलंब करते. यामुळे कोणत्याही उमेदवाराला त्याने निवडलेल्या पर्यायी विषयामुळे कोणत्याही प्रकारे तोटा किंवा गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली जाते.
पारंपरिक किंवा वर्णनात्मक स्वरूपाच्या उत्तरपत्रिकांच्या मॉडरेशन आणि मूल्यमापन प्रक्रियेची सविस्तर माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर खालील लिंकवर उपलब्ध आहे: https://upsc.gov.in/content/method-moderation-adopted-commission-cannot-be-faulted-subjective-or-un-scientific
सीसॅट (CSAT) ही एक पात्रता प्राप्त करण्यासाठीची प्रश्नपत्रिका असून, उमेदवारांमध्ये किमान दर्जाची गुणवत्ता आणि विश्लेषणात्मक क्षमता असल्याची खात्री करणे हा तिचा उद्देश आहे. यातील प्रश्नांची पातळी ही माध्यमिक (Matriculation/10th) स्तराची असते.
तथ्यात्मक चुकांना आव्हान देण्यासाठी UPSC ने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर (https://upsconline.nic.in) 'क्वेश्चन पेपर रिप्रेझेंटेशन पोर्टल' (QPRep) नावाचे एक समर्पित पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.
उमेदवार प्रश्नपत्रिकेतील विसंगती आणि तात्पुरत्या उत्तरतालिकांबाबत (नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 2026 पासून लागू) या पोर्टलद्वारे आपले म्हणणे मांडू शकतात. याव्यतिरिक्त, उमेदवार 'सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टम' (CPGRAMS) आणि ईमेलद्वारे देखील आपल्या तक्रारी नोंदवू शकतात,
विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान (स्वतंत्र प्रभार), आणि पंतप्रधान कार्यालय, कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि पेन्शन, अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सोमवारी राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.
* * *
सुषमा काणे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2243965)
आगंतुक पटल : 164