अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत सरकारने सूक्ष्म वित्त संस्थांसाठी क्रेडिट हमी योजना–2.0 (सीजीएसएमएफआय–2.0) केली सुरू

Posted On: 21 MAR 2026 2:00PM by PIB Mumbai

 

भारत सरकारने सूक्ष्म वित्त संस्थांसाठी क्रेडिट हमी योजना–2.0  (सीजीएसएमएफआय –2.0) सुरू केली आहे. बँका/वित्तीय संस्थांना नॅशनल क्रेडिट गॅरंटी ट्रस्टी कंपनी लिमिटेड मार्फत हमी कवच प्रदान करणे, हा या योजनेचा उद्देश आहे. हे कवच एनबीएफसी-एमएफआय आणि इतर सूक्ष्म वित्त संस्थांना लहान कर्जदारांना पुढे कर्ज देण्यासाठी दिलेल्या आर्थिक सहाय्यावर होऊ शकणाऱ्या संभाव्य नुकसानासाठी असेल.

योजनेची मुख्य वैशिष्ट्ये:
• पात्र कर्जदार: भारतीय रिझर्व्ह बँक यांनी वेळोवेळी निर्धारित केलेल्या सूक्ष्म वित्त निकषांनुसार विद्यमान किंवा नवीन लहान कर्जदार.
• हमी कव्हरेज: लहान एनबीएफसी-एमएफआय / एमएफआय साठी थकबाकी रकमेच्या 80%, मध्यमसाठी 75% आणि मोठ्यांसाठी 70% हमी.
• हमी शुल्क: मंजूर रकमेवर पहिल्या वर्षी 0.50% वार्षिक आणि त्यानंतर उर्वरित रकमेवर.
• व्याजदर: एमएलआय कडून एनबीएफसी-एमएफआय / एमएफआय’ना दिल्या जाणाऱ्या कर्जावर बाह्य बेंचमार्क-आधारित कर्ज दर किंवा एमसीएलआर + 2% वार्षिक मर्यादा. लहान कर्जदारांना पुढे कर्ज देताना, मागील 6 महिन्यांच्या सरासरी दरापेक्षा 1% कमी दर ठेवणे बंधनकारक.
• वैधता: 30 जून 2026 पर्यंत किंवा 20,000 कोटी रुपयांपर्यंत कर्ज हमी दिली जाईपर्यंत, यापैकी जे आधी होईल.

परिणाम:
या योजनेमुळे सूक्ष्म वित्त क्षेत्रात कर्ज प्रवाह वाढण्यास मदत होणार असून, अंदाजे 36 लाख लहान कर्जदारांना लहान एनबीएफसी-एमएफआय / एमएफआय मार्फत कर्जपुरवठा सुलभ होईल.

***

माधुरी पांगे/हेमांगी कुलकर्णी/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2243414) अभ्यागत कक्ष : 24