वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
'पीएम गतिशक्ती' अंतर्गत 'नेटवर्क नियोजन गटा'च्या 110 व्या बैठकीत प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांचे केले मूल्यमापन
नियोजन गटाने रेल्वे मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय तसेच रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या प्रकल्पांचे केले मूल्यमापन
Posted On:
20 MAR 2026 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2026
पायाभूत सुविधा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागात (डीपीआय आय टी) नेटवर्क नियोजन गटाची (एन पी जी) 110 वी बैठक आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनच्या (पीएमजीएस एन एम पी) अनुषंगाने बहुविध वाहतूक जोडणी आणि लॉजिस्टिक्सची कार्यक्षमता वाढवण्यावर या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले. एनपीजीने एकात्मिक बहुविध वाहतूक पायाभूत सुविधा, आर्थिक आणि सामाजिक केंद्रांपर्यंत शेवटच्या मैलापर्यंतचा संपर्क आणि 'संपूर्ण शासन' दृष्टिकोन या पंतप्रधान गतिशक्ती तत्त्वांनुसार 2 रेल्वे प्रकल्प, 2 मेट्रो प्रकल्प आणि 2 रस्ते व महामार्ग प्रकल्पांचे मूल्यांकन केले.
या उपक्रमांमुळे वाहतूक सेवेची कार्यक्षमता वाढेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रातील भागांना महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिक लाभ प्राप्त होतील, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पांचे मूल्यमापन आणि त्यांचे अपेक्षित परिणाम खाली सविस्तरपणे दिले आहेत:
- अरक्कोणम ते चेंगलपट्टू (तामिळनाडू) दरम्यान रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण
- व्हाइटफील्ड आणि बंगारपेट (कर्नाटक) स्थानकांदरम्यान प्रस्तावित चौपदरीकरण
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (एम ओ एच यू ए)
मुंबई मेट्रो मार्ग 11 (आणिक डेपो ते गेटवे ऑफ इंडिया) (महाराष्ट्र): गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने महाराष्ट्रात आणिक डेपो ते गेटवे ऑफ इंडिया या दरम्यान मुंबई मेट्रो मार्ग 11 च्या उभारणीचा प्रस्ताव मांडला आहे; या मार्गाची एकूण लांबी 17.41 किमी असेल. पूर्णपणे भुयारी असलेल्या या मार्गावर अनेक 'इंटरचेंज स्टेशन्स' (परस्पर जोडणी केंद्रे) असतील, जी सध्या कार्यरत असलेल्या तसेच आगामी मेट्रो मार्गांना जोडतील. यामुळे मुंबई महानगर क्षेत्रातील सुमारे 337 किमी लांबीचे एकात्मिक मेट्रो जाळे अधिकच बळकट होईल.
ही मार्गरेषा दक्षिण आणि मध्य मुंबईतील वडाळा, भायखळा, नागपाडा, क्रॉफर्ड मार्केट, सीएस एमटी, हॉर्निमन सर्कल आणि गेटवे ऑफ इंडिया यांसह प्रमुख निवासी, व्यावसायिक, संस्थात्मक आणि वारसा स्थळांना उच्च-क्षमतेची जोडणी प्रदान करेल.
या प्रकल्पामुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होऊन आणि एकूण शहरी गतिशीलता वाढून महत्त्वपूर्ण सामाजिक-आर्थिक लाभ होतील अशी अपेक्षा आहे. यामुळे प्रवासाचा वेळ, वाहनांचा परिचालन खर्च आणि इंधन वापरात बचत होईल, तसेच रस्ते अपघात कमी होण्यास आणि वायू प्रदूषणाची पातळी खाली आणण्यासही मदत होईल. मेट्रो मार्गिका -11 च्या अंमलबजावणीमुळे मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होईल आणि अधिक कार्यक्षम, शाश्वत आणि पर्यावरणीयदृष्ट्या जबाबदार अशा शहरी वाहतूक व्यवस्थेच्या विकासाला चालना मिळेल.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प मार्ग-4B: हडपसर-लोणी काळभोर आणि मार्ग-4सी: हडपसर बस डेपो ते सासवड रोड (महाराष्ट्र): गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाने महाराष्ट्रात पुणे मेट्रो मार्ग-4 च्या विस्ताराचा (4बी आणि 4सी) प्रस्ताव दिला आहे. या मार्गिकेची एकूण लांबी 16.67 किमी असेल. या प्रस्तावित मार्गांचा उद्देश पुणे-सोलापूर महामार्ग आणि सासवड रस्त्यालगतच्या हडपसर, मांजरी, लोणी काळभोर, फुरसुंगी, भेकराई नगर आणि वडकी यांसारख्या प्रमुख निवासी, औद्योगिक आणि विकसनशील शहरांना जोडून पुण्यातील पूर्व आणि दक्षिण-पूर्व भागातील संपर्क व्यवस्था अधिक मजबूत करणे हा आहे. मार्ग-4बी (हडपसर-लोणी काळभोर) पुणे-सोलापूर महामार्गालगत धावेल, तर मार्ग-4सी (हडपसर बस डेपो-सासवड रोड) सासवड रस्त्यावरून जाईल आणि हडपसर येथे अखंडपणे जोडला जाईल.
या प्रकल्पामुळे प्रमुख बस डेपो आणि पुणे-दौंड रेल्वे मार्गाशी संपर्क सुधारून पुण्यातील सार्वजनिक वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. या विस्तारांमुळे शहरी वाहतूक अधिक सुलभ होईल, रस्त्यांवरील कोंडी आणि प्रवासाचा वेळ कमी होईल, तसेच वाहनांमुळे होणारे कार्बनचे उत्सर्जन कमी होण्यास हातभार लागेल. हा उपक्रम शाश्वत शहरी विकासाला पाठिंबा देईल आणि विस्तारणाऱ्या महानगरीय प्रदेशासाठी कार्यक्षम, विश्वासार्ह सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय उपलब्ध करून देईल.
रस्ते, परिवहन आणि महामार्ग मंत्रालय
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या (एनई-4) (मध्य प्रदेश) बदनावर बायपास ते तिमारवानी इंटरचेंज पासून बदनावर-पेटलावद-थांडला-तिमारवानी मार्गाच्या चौपदरीकरणाचे बांधकाम :
फोटुला बोगद्याचे एनएच-1(लडाख) वरील त्याच्या पोहोच मार्गांसह बांधकाम: सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा असलेला हा बोगदा, संरक्षण दलाच्या ताफ्यांची आणि अत्यावश्यक पुरवठ्याची अखंड वाहतूक सुलभ करेल, तसेच या महत्त्वपूर्ण मार्गावरील वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत करेल. याशिवाय, लेह, कारगिल आणि श्रीनगर यांच्यात स्थिर संपर्क व्यवस्था सुनिश्चित होऊन सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल , परिणामी कारगिल, खाल्तसी, बुधखरबू, लामयुरू आणि लेह यांसारख्या प्रमुख ठिकाणांना त्याचा फायदा होईल.
* * *
सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2243195)
अभ्यागत कक्ष : 14