नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारकडून सौर इंगॉट्स आणि वेफर्सचाही एएलएमएम चौकटीमध्ये समावेश; 1 जून 2028 पासून लागू होणार

Posted On: 18 MAR 2026 9:34AM by PIB Mumbai

एमएनआरईने इंगॉट्स आणि वेफर्ससाठी एएलएमएम सूची III लागू करण्यासाठी एएलएमएम आदेशाची कक्षा वाढवण्याचा प्रस्ताव मांडला असून, तो 1 जून 2028 पासून अंमलात येईल. अगोदरच प्रक्रियेत असलेल्या प्रकल्पांचे संरक्षण करण्यासाठी योग्य सुरक्षा तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. एमएनआरईच्या सध्याच्या आदेशात, मॉड्यूल्स आणि सेल्ससाठी आधीपासूनच लागू असलेल्या एएलएमएम सूचींतील अनिवार्य खरेदीविषयक आवश्यकता सध्या मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून असलेल्या,सौर पुरवठा साखळीतील सौर इंगॉट्स आणि वेफर्ससाठीही लागू  करून आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

भारताची सौर उत्पादन परिसंस्था मजबूत करण्याच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल असल्याचे केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री, प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. मंत्री म्हणाले की, या निर्णयामुळे देशांतर्गत उत्पादनात वाढ होईल, पुरवठा साखळीची लवचिकता सुधारेल, आयातीवरील अवलंबित्व कमी होईल तसेच संपूर्ण सौर मूल्य साखळीत उच्च दर्जाची मानके सुनिश्चित होतील .

महत्त्वाच्या तरतुदी

  • अंमलबजावणीची तारीख: 1 जून, 2028 - या तारखेपासून नेट मीटरिंग/ओपन ऍक्सेस प्रकल्पांसहित सर्व प्रकल्पांना एएलएमएम-सूचीतील वेफर्सचाच वापर करावा लागेल

  • अंतिम तारीख: वेफर्ससाठी एएलएमएम सूची-III ची प्रारंभिक यादी प्रकाशित झाल्यानंतर 7 दिवसांनी. या तारखेनंतर कलम 63 मार्गाद्वारे सादर केलेल्या निविदांमध्ये एएलएमएम सूची III मधील अनुरूप वेफर्सच्या वापराचा उल्लेख करणे अनिवार्य असेल.

  • प्रारंभिक यादी जारी करण्यासाठीची किमान मर्यादा: किमान देशांतर्गत पुरवठा उपलब्ध झाल्यावरच 15 GW एकत्रित क्षमतेसह किमान 3 स्वतंत्र उत्पादन युनिट्स (एकाच मालकीचे किंवा नियंत्रणाखाली नसलेले) ची सूची जारी केली जाईल हे सुनिश्चित केले जाईल.

  • अनिवार्य इंगॉट क्षमता: वेफर्ससाठी  एएलएमएम सूचीत-III मध्ये समाविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उत्पादकांकडे समतुल्य इंगॉट उत्पादन क्षमता असणे आवश्यक आहे, त्यामुळे इंगॉट्ससाठी अपस्ट्रीम इंटिग्रेशनला प्रोत्साहन मिळते.

  • मॉड्यूल सूचीची अखंडता: अंमलात येण्याच्या तारखेपासून, एएलएमए सूची-I (सौर पीव्ही मॉड्यूल) मध्ये केवळ एएलएमएम सूचीबद्ध सेल आणि वेफर्स वापरून उत्पादित केलेल्या मॉड्यूलचा समावेश असेल. कोणताही व्यत्यय टाळण्यासाठी, पूर्वीपासून मान्यता मिळालेल्या प्रकल्पांकरिता स्वतंत्र सूची ठेवल्या जातील.

  • डीसीआर तरतुदी: या आदेशात विद्यमान एमएनआरई योजनांअंतर्गत असलेल्या कोणत्याही देशांतर्गत सामग्रीविषयक अटी (डीसीआर) तरतुदींना सौम्य किंवा रद्द केलेल्या नाहीत.

अपेक्षित फायदे

वेफर्स हा पॉलिसिलिकॉन आणि सोलर सेल्स दरम्यानचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. भारताची सध्या देशांतर्गत वेफर उत्पादन क्षमता मर्यादित असून त्याबाबतीत देश आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.

एएलएमएम सूची-III सादर केल्याने पुढील परिणाम अपेक्षित आहेत:

  • भारतातील इंगॉट आणि वेफर उत्पादनांच्या सुविधांमध्ये गुंतवणुकीला चालना;

  • पुरवठा साखळीच्या सुरक्षेत वाढ आणि आयातीतील व्यत्ययांमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांमध्ये घट;

  • वेफरपासून मॉड्यूलपर्यंत सौर घटकांची गुणवत्ता आणि शोधक्षमतेची खात्री;

  • सौर ऊर्जा निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यात कुशल रोजगारांची निर्मिती;

एएलएमएमचा हा विस्तार आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आणि 2030 पर्यंत गैर-जीवाश्म इंधनापासून 500 गिगावॅट वीजनिर्मिती क्षमता साध्य करण्याचे देशाचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठीचे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

पार्श्वभूमी

भारताचा मॉडेल आणि उत्पादकांची मान्यताप्राप्त यादी (एएलएमएम) आदेश, 2019 ही गुणवत्ता आणि विश्वासार्ह चौकट असून ती देशातील सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये वापरली जाणारी सौर उपकरणे स्थानिक उत्पादन मानकांनुसार असतील हे सुनिश्चित करते. हा आदेश विद्युत कायदा, 2003 च्या कलम 63 अंतर्गत स्पर्धात्मक निविदांद्वारे बहाल केलेल्या प्रकल्पांना, तसेच नेट मीटरिंग किंवा ओपन ॲक्सेस प्रकल्पांना लागू होतो.

एएलएमएम सादर केल्यापासून, देशांतर्गत सौर उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. एएलएमएम सूची-I (सौर पीव्ही मॉड्यूल्स) 2021 मधील 8.2 GW वरून सध्या सुमारे 172 GW पर्यंत वाढली आहे. अलीकडेच जारी केलेल्या एएलएमएम सूची-II (सौर पीव्ही सेल्स) ने सात महिन्यांतच 27 GW चा टप्पा गाठला असून यातून देशांतर्गत गुंतवणुकीला चालना देण्यात असलेल्या या चौकटीची परिणामकारकता दिसून येते.

***

NehaKulkarni / ManjiriGanoo / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2241598) अभ्यागत कक्ष : 27