अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

वित्तीय सेवा विभागाचा दिव्यांग व्यक्तींच्या आर्थिक समावेशनावर भर

Posted On: 17 MAR 2026 7:17PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 17 मार्च 2026

वित्तीय सेवा विभागाने (डीएफएस) सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँका, विमा कंपन्या आणि इतर वित्तीय संस्थांना ‘भारतीय सांकेतिक भाषेचा (आयएसएल) वापर करून श्रवण व वाचा बाधित  व्यक्तींशी संवाद सुलभ करण्याचे निर्देश दिले आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी (पीडब्ल्यूडी) समावेशक आणि सुलभ वातावरण निर्माण करणे, तसेच या संस्थांद्वारे पुरवल्या जाणाऱ्या वित्तीय सेवांचा त्यांना लाभ मिळवून देणे, हे याचे उद्दिष्ट आहे.

या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी, या संस्थांना कृत्रिम बुद्धिमत्तेसह (एआय) तंत्रज्ञान-आधारित संवाद साधनांचा वापर करण्याची, तसेच आवश्यक असेल तेव्हा, दिव्यांग व्यक्तींच्या विशेष गरजांची पूर्तता करणाऱ्या नागरी सामाजिक संस्थांमधील स्वयंसेवकांची  सेवा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. यात सांकेतिक भाषेतील अनुवाद सेवेचा  समावेश आहे. सांकेतिक भाषेत संवाद साधू इच्छिणाऱ्या ग्राहकांना सहाय्य करण्यासाठी पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण करण्यावर, तसेच त्यांच्या प्रशिक्षणावर वित्तीय सेवा विभागाचा भर आहे.

निलीमा चितळे/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2241422) अभ्यागत कक्ष : 18