केंद्रीय लोकसेवा आयोग
azadi ka amrit mahotsav

नागरी सेवा (मुख्य) परीक्षा, 2024

प्रविष्टि तिथि: 16 MAR 2026 9:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 मार्च 2026

 

नागरी सेवा परीक्षा, 2024 चा निकाल 22.04.2025 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर करण्यात आला होता. या निकालानुसार 1129 रिक्त पदांसाठी भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय विदेश सेवा, भारतीय पोलीस सेवा तसेच इतर काही केंद्रीय सेवा (गट ‘अ’ आणि गट ‘ब’) मध्ये नियुक्तीसाठी गुणवत्ता क्रमावर आधारित 1009 उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती.

संबंधित प्रसिद्धी पत्रकात, असेही नमूद करण्यात आले होते की आयोगाने नागरी सेवा परीक्षा नियमावलीतील नियम 20(4) आणि 20(5) नुसार, संबंधित प्रवर्गांमध्ये अंतिम शिफारस केलेल्या उमेदवारांची एक एकत्रित राखीव यादी, गुणवत्ता क्रमानुसार तयार केली आहे.

कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या विनंतीनुसार, केंद्रीय लोकसेवा आयोगाने यापूर्वी 28 ऑक्टोबर 2025 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे 114 उमेदवारांची राखीव यादी जाहीर केली होती. या यादीत सामान्य प्रवर्गातील 94, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील 5, ओबीसीमधील 13, अनुसूचित जातीतील एका आणि अनुसूचित जमातीतील एका उमेदवारांचा समावेश होता. आता कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या नव्या विनंतीनुसार, आयोगाने नागरी  सेवा परीक्षा, 2024 च्या आधारे राखीव यादीतील उर्वरित पद भरण्यासाठी सामान्य प्रवर्गातील एका उमेदवाराची शिफारस केली आहे. संबंधित उमेदवारास याबाबतची माहिती कार्मिक व प्रशिक्षण विभागाकडून थेट देण्यात येईल.

एकत्रित राखीव यादीतून गुणवत्ता क्रमावर आधारित शिफारस करण्यात आलेल्या या एका उमेदवाराचा तपशील खाली दिलेला आहे.  

अनुक्रम रोल नंबर उमेदवाराचे नाव
1 6206417 वीरगंधम लक्ष्मी सुजीता

 

* * *

निलिमा चितळे/राधिका अघोर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2240991) आगंतुक पटल : 82
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati