पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोलकाता पश्चिम बंगाल इथल्या विविध विकास प्रकल्पांच्या लोकार्पण आणि पायाभरणी समारंभ, तसेच त्यांच्या भाषणाची क्षणचित्रे केली सामायिक.
Posted On:
15 MAR 2026 9:00AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, पश्चिम बंगालची राजधानी, कोलकाता इथे 18000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. या समारंभाची क्षणचित्रे पंतप्रधानांनी सामायिक केली आहेत. यावेळी ,बोलताना, पंतप्रधानांनी, पश्चिम बंगाल आणि पूर्व भारतात, विकासाचा नवा अध्याय लिहिला जात असल्याचे, नमूद केले होते.
एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या मालिकेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात—
" देशभरात रेल्वेला आधुनिक बनवण्याच्या आमच्या अभियानात पश्चिम बंगाल मागे राहू नये, यासाठी आम्ही इथेही, रेल्वे पायाभूत सुविधांचा जलद गतीने विस्तार करतो आहोत. सहा अमृत भारत स्थानकांचे उद्घाटन आणि पुरुलिया – आनंद विहार टर्मिनल दरम्यान, नव्या एक्सप्रेस ट्रेनचा शुभारंभ, हे या दिशेने टाकलेले महत्वाचे पाऊल आहे.”
“कोलकाता इथे आज बंदरविषयक पायाभूत सुविधाशी संबंधित ज्या प्रकल्पाची पायाभरणी आणि लोकार्पण झाले, त्यामुळे, केवळ मालवाहू वाहतुकीला गती मिळणार नाही, तर, बंदरांची क्षमता वाढण्यासाह, व्यापाराच्या अनेक नव्या सुविधा तयार होतील. ”
“कोलकात्याच्या विकासासाठी, पश्चिम बंगालच्या लोकांचा उत्साह, भारावून टाकणारा आहे”
***
शैलेश पाटील/राधिका अघोर/परशुराम कोर
Follow us on social media:
@PIBPanaji
/PIBPanaji
/pibpanaji
pibgoa[at]gmail[dot]com
/PIBPanaji
/pibpanaji
(Release ID: 2240433)
अभ्यागत कक्ष : 12
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu
,
Malayalam