कंपनी व्यवहार मंत्रालय
जबाबदार व्यावसायिक आचरण आणि 'पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन' यांच्या सामाजिक पैलू संदर्भात पाचव्या आंतर-मंत्रालयीन सल्लामसलत बैठकीचे आयआयसीए’ने केले आयोजन
Posted On:
15 MAR 2026 1:07PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स' (आयआयसीए) ने, नवी दिल्ली येथे नुकतीच 'जबाबदार व्यावसायिक आचरण' तसेच 'पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन' (ईएसजी) च्या सामाजिक पैलूवर पाचवी आंतर-मंत्रालयीन सल्लामसलत बैठक आयोजित केली.
भारतामध्ये जबाबदार व्यावसायिक आचरण आणि शाश्वतता प्रशासनासाठी धोरणात्मक सुसंगतता आणि संस्थात्मक सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने, आयआयसीए च्या 'स्कूल ऑफ बिझनेस एन्व्हायर्नमेंट' द्वारे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या सहयोगाने या सल्लामसलतीचे आयोजन करण्यात आले होते.

आयआयसीए चे महासंचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यशाळेची सुरुवात झाली. त्यांनी बदलत्या जागतिक पुरवठा साखळ्या आणि शाश्वततेबाबतच्या वाढत्या अपेक्षांच्या संदर्भात, जबाबदार व्यावसायिक आचरणाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. आज जबाबदार व्यावसायिक पद्धतींची व्याप्ती केवळ कॉर्पोरेट अहवाल चौकटींपुरती मर्यादित राहिलेली नाही; तर त्या आर्थिक स्पर्धात्मकता, शाश्वत विकास आणि आंतरराष्ट्रीय व्यापार एकत्रीकरणाशी अधिकाधिक जोडल्या जात आहेत, असे सिंह यांनी सांगितले.
कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाचे वरिष्ठ आर्थिक सल्लागार शांतनू मित्रा यांनी आपल्या भाषणात, भारताच्या कॉर्पोरेट प्रशासन परिसंस्थेमध्ये जबाबदार व्यावसायिक आचरणाचे धोरणात्मक महत्त्व आणि जागतिक मूल्य साखळ्यांमध्ये कार्यरत असलेल्या व्यवसायांसाठी त्याची वाढती प्रासंगिकता यावर प्रकाश टाकला. 'कंपनी कायदा 2013' च्या विविध तरतुदींमध्येच जबाबदार व्यवसायाची संकल्पना समाविष्ट आहे, असे मित्रा यांनी सांगितले. तसेच, ही वैधानिक चौकट आधुनिक काळातील व्यवसायांसाठी पूरक राहील तसेच वैधानिक आणि नियामक अनुपालनासाठी जागतिक मापदंड म्हणून कार्य करेल, याची खात्री करण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले.
या सल्लामसलतीमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या 'सभ्य रोजगार तांत्रिक सहाय्य पथका'च्या दक्षिण आशिया आणि भारत कार्यालयाच्या संचालक मिचिको मियामोटो यांचे विशेष भाषणही झाले. त्यांनी जागतिक दृष्टिकोन मांडले तसेच जबाबदार व्यावसायिक आचरणाच्या क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीचे आणि नेतृत्वाचे विशेष कौतुक केले. मियामोटो यांनी विकसित होत असलेल्या कॉर्पोरेट शाश्वतता चौकटींच्या अंतर्गत 'सभ्य रोजगार', कामगार मानके आणि सर्वसमावेशक वाढ यांना चालना देण्याचे महत्त्व अधिक स्पष्ट केले.
आयआयसीए च्या 'स्कूल ऑफ बिझनेस एन्व्हायर्नमेंट'च्या प्रमुख प्रा. गरिमा दधीच यांनी आपल्या सादरीकरणात, भारताच्या 'जबाबदार व्यावसायिक आचरण' प्रवासाच्या उत्क्रांतीचा आलेख मांडला. त्यांनी या प्रवासातील प्रमुख धोरणात्मक टप्पे आणि नियामक घडामोडी अधोरेखित केल्या, ज्यांनी देशाच्या जबाबदार व्यावसायिक चौकटीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांवरील जबाबदार व्यवसाय आचारसंहितेच्या (एनजीआरबीसी) 9 तत्त्वांनुसार राष्ट्रीय उपक्रम आणि धोरणात्मक उपाययोजनांचे मॅपिंग करणाऱ्या आयआयसीएच्या सध्या सुरू असलेल्या संशोधनातील अंतर्दृष्टीही त्यांनी सामायिक केली.
सहभागी प्रतिनिधींनी चर्चेत त्यांची संबंधित मंत्रालये आणि सरकारी संस्थांच्या प्रमुख उपक्रमांवर प्रकाश टाकला.
एफएसएसएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित पुन्हानी यांनी जबाबदार उत्पादन मानके आणि अनुपालन भार यांच्यात संतुलन साधण्यात अन्न क्षेत्रासमोरील आव्हानांकडे, विशेषतः फ्रंट-ऑफ-पॅक पोषण लेबलिंग नियमावली संदर्भातील आव्हानांकडे लक्ष वेधले.
***
शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2240377)
अभ्यागत कक्ष : 14