पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केली आसाममधील सिल्चर येथे विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी प्रसंगी केलेल्या भाषणातील काही महत्त्वाच्या मुद्यांची शब्दचित्रे
प्रविष्टि तिथि:
14 MAR 2026 4:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली: 14 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील सिल्चर येथे झालेल्या विविध विकास प्रकल्पांच्या पायाभरणी आणि उद्घाटन समारंभातील भाषणातील काही ठळक मुद्यांची माहिती देणारी शब्दचित्रे सामायिक केली आहेत. संस्कृती आणि चैतन्यशीलता या वैशिष्ट्यांमुळे ओळखल्या जाणाऱ्या बराक खोऱ्याला भेट देणे हा आपल्यासाठी नेहमीच एक खास अनुभव असतो असे पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले
एक्स समाजमाध्यमावर केलेल्या अनेक पोस्टमध्ये मोदी म्हणतात:
“आज ज्याचे भूमीपूजन झाले आहे, तो शिलाँग-सिल्चर हाय-स्पीड कॉरिडॉर, सिल्चरला मिझोरम, मणिपूर आणि त्रिपुराशी जोडेल. याचा आसामसह संपूर्ण ईशान्य भागातील आमच्या शेतकरी बंधू-भगिनींना फायदा होईल.”
“गेल्या एका दशकात आमच्या सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे आसाममध्ये पुढील पिढीच्या तंत्रज्ञानाशी संबंधित इकोसिस्टम आणि प्रतिभावंत तयार होत आहेत. याच बरोबर वैद्यकीय शिक्षणाचे सशक्त नेटवर्क तयार झाल्यामुळे येथील युवकांच्या समोर संधींचे नवे आकाश खुले झाले आहे.”
“सिल्चरमध्ये अलोट संख्येने आलेल्या आसामच्या आमच्या कुटुंबियांचा उत्साहच डबल इंजिन सरकारच्या विकासकामांवर त्यांचा अतूट विश्वास असल्याचे सांगतो आहे.”
***
शैलेश पाटील/मंजिरी गानू/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2240235)
आगंतुक पटल : 68
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam