सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

साखर कारखान्यांसाठी इथेनॉल खरेदीत समानता

Posted On: 11 MAR 2026 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 मार्च 2026

इथेनॉल खरेदीसाठी निर्धारित अटी व शर्तींनुसार सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना इथेनॉल पुरवठा करणाऱ्या सहकारी साखर कारखान्यांसह सर्व पुरवठादारांना 21 दिवसांच्या निश्चित कालावधीत देयके अदा केली जात आहेत. खासगी साखर कारखान्यांच्या तुलनेत देयकांमध्ये विलंब किंवा भेदभाव झाल्याची कोणतीही घटना नोंदलेली नाही.

डिस्टिलरी युनिट चालवणारे सहकारी साखर कारखाने त्यांच्या कार्यभांडवलाच्या गरजा बँक कर्ज, संस्थात्मक वित्तपुरवठा तसेच अंतर्गत संसाधनांच्या वापरातून पूर्ण करू शकतात. याशिवाय सहकार मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील वैधानिक संस्था असलेल्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने कार्यभांडवल कर्जावरील फ्लोटिंग  व्याजदरात कपात केली आहे, ज्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना कार्यभांडवल सहज उपलब्ध होईल.

ही माहिती केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.

सुषमा काणे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2238487) अभ्यागत कक्ष : 11
Read this releasein: English , हिन्दी