नागरी उड्डाण मंत्रालय
पश्चिम आशियातील हवाई क्षेत्राची स्थिती – भारतीय विमान कंपन्यांकडून आज 51 विमानांचे नियोजन
प्रविष्टि तिथि:
06 MAR 2026 10:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 मार्च 2026
नागरी हवाई वाहतूक मंत्रालय भारत आणि पश्चिम आशिया दरम्यानच्या विमान प्रवासावर परिणाम करणाऱ्या पश्चिम आशियातील बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. प्रवाशांची सुरक्षा आणि विमान परिचालनाचे सुव्यवस्थित संचालन सुनिश्चित करण्यासाठी सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन विमान कंपन्या आवश्यक ते परिचालन बदल करत आहेत.
5 मार्च 2026 रोजीच्या प्रवाशांच्या वर्दळीच्या आकडेवारीतून असे दिसून येते की, पश्चिम आशियातून एकूण 40 विमाने भारतीय कंपन्यांद्वारे भारतात आली, ज्यातून 7,205 प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे एकूण प्रवासी आगमनाची संख्या 14,992 वर पोहोचली आहे.
6 मार्च 2026 साठी, भारतीय विमान कंपन्यांकडून 51 विमानांचे नियोजन करण्यात आले आहे, जे परिचालनात्मक सुलभता आणि सध्याच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
मंत्रालय सतत विमान कंपन्यांच्या संपर्कात असून या काळात विमान भाड्यात अवाजवी वाढ होणार नाही याची काळजी घेण्यासाठी तिकीट दरांवर बारकाईने लक्ष ठेवत आहे.
मंत्रालय, विमान कंपन्या आणि संबंधित भागधारकांशी निकट समन्वय राखून आहे आणि प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. विमान वेळापत्रकातील ताज्या बदलांची माहिती घेण्यासाठी प्रवाशांना आपापल्या विमान कंपन्यांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार पुढील ताजी माहिती प्रसिद्ध केली जाईल.
निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2236223)
आगंतुक पटल : 65