पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी साधला संवाद
Posted On:
05 MAR 2026 9:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 मार्च 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फ्रेंच प्रजासत्ताकाचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा केली.
संभाषणादरम्यान उभय नेत्यांनी पश्चिम आशियात आकार घेत असलेल्या परिस्थितीबद्दल आपल्या सामायिक चिंतांवर चर्चा केली आणि संवाद आणि राजनैतिकतेकडे परत येण्याची गरज यावर भर दिला.
पंतप्रधान म्हणाले की, या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पुनर्संचयित करण्यासाठी भारत आणि फ्रान्स एकत्र काम करत राहतील आणि समन्वय साधतील.
पंतप्रधानांनी X वर लिहिले;
“आज माझे मित्र राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी बोललो. पश्चिम आशियात आकार घेत असलेल्या परिस्थितीबद्दल आमच्या सामायिक चिंतांवर तसेच संवाद आणि राजनैतिकतेकडे परत येण्याच्या गरजेबद्दल आम्ही चर्चा केली. या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य लवकरात लवकर पुनर्संचयित करण्यासाठी आम्ही जवळून काम करत राहू आणि समन्वय साधत राहू.
@EmmanuelMacron”
शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2235768)
अभ्यागत कक्ष : 61
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam