युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी जगातील पहिल्या फ्रँचायझीवर आधारित "सायकलिंग लीग ऑफ इंडिया" च्या लोगोचे अनावरण केले

Posted On: 05 MAR 2026 7:13PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 5 मार्च 2026

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज भारतातील अग्रगण्य क्रीडा उपक्रम, ‘सायकलिंग लीग ऑफ इंडिया’, या जगातील पहिल्या फ्रँचायझी-आधारित रोड सायकलिंग लीगच्या लोगोचे अनावरण केले.

या उपक्रमाची सुरुवात, देशातील सायकलिंग या क्रीडा प्रकारात निर्णायक परिवर्तन घडवून आणेल, असे केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ मनसुख मांडविया यावेळी म्हणाले.  

या उपक्रमाची सुरुवात भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक महत्त्वाचा क्षण आहे. जगातील पहिल्या फ्रँचायझी आधारित रोड सायकलिंग लीगची सुरुवात करून, आम्ही केवळ शर्यतींचे आयोजन करत नाही, तर एक व्यावसायिक परिसंस्था तयार करत आहोत, जी प्रतिभेला प्रोत्साहन देईल, जगाचे लक्ष वेधून घेईल आणि तंदुरुस्त आणि चैतन्यशील भारताच्या आमच्या दृष्टिकोनाशी सुसंगत असेल, असे ते म्हणाले.

हा उपक्रम देशात अलीकडेच व्यावसायिक सायकलिंग स्पर्धांमुळे या क्रीडा प्रकाराला मिळालेल्या लोकप्रियतेवर आधारित आहे, आणि तो युवा भारतीयांना हा खेळ खेळण्यासाठी प्रेरित करेल.

पुणे ग्रँड टूर असो, अहमदाबादमधील ही लीग असो किंवा देशातील वेगवेगळ्या ठिकाणी दर आठवड्याला होणारी संडे ऑन सायकल असो, या सर्व गोष्टींमुळे येत्या काही दिवसांत भारतात सायकलिंग हा एक क्रीडा प्रकार म्हणून प्रस्थापित होईल, असे ते म्हणाले.

आगामी लीगमध्ये आठ शहरे, अथवा प्रदेशांवर आधारित फ्रँचायझी असतील, प्रत्येक स्पर्धेत दहा सायकलस्वारांचा समावेश असेल.

प्रत्येक संघात जागतिक कौशल्य आणि स्पर्धात्मकता आणणारे दोन आंतरराष्ट्रीय सायकलस्वार असतील, तसेच उदयोन्मुख भारतीय प्रतिभेला चालना देण्यासाठी आणि खेळाची दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करण्यासाठी दोन कनिष्ठ सायकलस्वारांचा समावेश असेल.

या स्पर्धा तीन टप्प्यांमध्ये आयोजित केल्या जातील, आणि त्याचा समारोप ग्रँड फिनालेने होईल. स्पर्धेत क्रायटेरियम रेस, टीम टाइम ट्रायल्स आणि मास स्टार्ट इव्हेंट यासारख्या विविध स्वरूपांच्या शर्यतींचा समावेश असेल, यामधून प्रेक्षकांना धोरणात्मक चढाओढ आणि उत्कंठावर्धक थरार दोन्ही अनुभवायला मिळेल.


शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2235696) अभ्यागत कक्ष : 68