संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलासाठी मेसर्स शॉफ्ट शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे यांच्यासोबत 04 X 500 T (टन) क्षमतेच्या स्वयंचलित इंधन वाहतूक नौकांसाठी (फ्युएल बार्ज) करार

Posted On: 03 MAR 2026 3:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मार्च 2026

भारतीय नौदलासाठी 04 X 500 T (टन) क्षमतेच्या स्वयंचलित इंधन वाहतूक नौकांच्या बांधणीचा करार, मेसर्स शॉफ्ट शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड, ठाणे (एम एस एम ई शिपयार्ड) यांच्यासोबत 02 मार्च 2026 रोजी करण्यात आला आहे.

या नौका, भारत सरकारच्या "मेक इन इंडिया" आणि "आत्मनिर्भर भारत" उपक्रमांचे अभिमानास्पद प्रतिनिधित्व करणाऱ्या असून, त्यांची बांधणी 'इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग' या भारतीय जहाज नोंदणी संस्थेच्या (आय आर एस) वर्गीकरण नियमांनुसार केली जाईल.

बंदर आणि नांगरलेल्या ठिकाणी असलेल्या युद्धनौका आणि पाणबुड्यांना इंधन पुरवठा करणे, हे या जहाजांचे मुख्य काम असेल. या करारामुळे भारतीय नौदलाने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील शिपयार्ड्सच्या अर्थात जहाजबांधणी कारखान्यांच्या विकासाला प्रोत्साहन देण्याचे आपले धोरण सुरू ठेवले आहे. यामुळे 'मॅरिटाइम इंडिया व्हिजन 2030' ला अनुसरून देशांतर्गत जहाजबांधणी व्यवस्थेत मोलाचे योगदान मिळणार आहे.


 

निलीमा चितळे/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2235003) अभ्यागत कक्ष : 17