गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत- ब्रिटन यांच्यातला सहावा गृह विभाग स्तरीय संवाद नवी दिल्लीत संपन्न

Posted On: 27 FEB 2026 9:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 फेब्रुवारी 2026

 

भारत आणि ब्रिटन यांच्यातली गृह विभाग स्तरीय 6 वी बैठक (एचएडी) आज नवी दिल्लीत झाली. भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व सीमा व्यवस्थापन विभागाचे सचिव डॉ. राजेंद्र कुमार यांनी तर ब्रिटन च्या शिष्टमंडळाचे नेतृत्व गृह मंत्रालयाचे द्वितीय स्थायी सचिव सायमन रिडले यांनी केले. दोन्ही देशांचे अन्य वरीष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

WhatsApp Image 2026-02-27 at 15.29.25 (1).jpeg

यावेळी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी परस्पर हिताच्या आणखी काही क्षेत्रांबाबत तसेच सध्याच्या सहकार्याबाबत चर्चा केली. दहशतवाद विरोधातील सक्रिय सहकार्य आणि खलिस्तानी समर्थक अतिरेकीसह संघटित गुन्हेगारी तसेच ब्रिटनमधील भारतविरोधी गटाच्या कारवाया, अमली पदार्थांची तस्करी, स्थलांतर, गुन्हेगारी  कायदे व अंमल बजावणी सहकार्य, सायबर सुरक्षा या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली. ब्रिटनमधील भारतीय दूतावासाच्या व भारतीय मान्यवरांच्या  सुरक्षेविषयीची चिंता याचाही चर्चेत समावेश होता.

WhatsApp Image 2026-02-27 at 15.29.25 (2).jpeg

बैठकीच्या शेवटी सध्याच्या अस्तित्वात असलेल्या सहकार्याबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले. दोन्ही देशांमधील सुरक्षा सहकार्य वाढीची गती कायम राखून द्विपक्षीय संबंध बळकट करण्यावर  यावेळी सहमती झाली. 

WhatsApp Image 2026-02-27 at 15.29.25.jpeg   WhatsApp Image 2026-02-27 at 15.29.26.jpeg

WhatsApp Image 2026-02-27 at 15.29.26 (1).jpeg

 

* * *

निलिमा चितळे/सुरेखा जोशी/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2233791) अभ्यागत कक्ष : 58