संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरमधून उड्डाण करणार

Posted On: 26 FEB 2026 10:17PM by PIB Mumbai

 

 

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2026

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (27 फेब्रुवारी 2026) राजस्थानमधील जैसलमेरला भेट देतील. आपल्या या भेटीत त्या भारतीय हवाई दलाच्या  वायू शक्ती या सरावाची पाहणी करतील. या सरावाआधी, राष्ट्रपती जैसलमेर इथे स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरमधून (Light Combat Helicopter - LCH) उड्डाणही (Sortie) करणार आहेत. या अभियानाअंतर्गत दोन हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या संरचनेत उड्डाण केले जाणार आहे. याअंतर्गत दुसऱ्या हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरमधून हवाई दल प्रमुख, एअर चीफ मार्शल ए.पी. सिंह उड्डाण करणार आहेत.

 

सुषमा काणे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2233330) अभ्यागत कक्ष : 20