इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

एसआयए-इंडिया, सीईआरटी-इन ने जारी केलेल्या संयुक्त मार्गदर्शक तत्त्वांमुळे भारताच्या अंतराळ परिसंस्थेला सायबर संरक्षण

Posted On: 26 FEB 2026 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2026

भारताच्या अंतराळ व्यवस्थेसाठी उपग्रह दूरसंचार प्रणालींसह अंतराळ सायबर सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. या प्रणाली दुर्गम आणि सामरिक प्रदेशांशी संपर्क राखण्याचे आवश्यक स्रोत म्हणून काम करतात, राष्ट्रीय सुरक्षा मोहिमांना सहाय्य करतात, आपत्ती प्रतिसाद यंत्रणांना बळकटी देतात, नेव्हिगेशन आणि प्रसारण सेवा सुलभ करतात तसेच देशाच्या विकासासाठी आणि लवचिकतेसाठी आवश्यक असलेल्या विस्तृत आर्थिक क्रियाकलापांचे आधारस्तंभ म्हणून काम करतात.

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (एमईआयटीवाय) अखत्यारीतील इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीइआरटी-इन) ने एसआयए-इंडियाच्या सहकार्याने, अंतराळ दूरसंचार मालमत्तेच्या सुरक्षिततेच्या शाश्वतीसोबतच  भारताच्या अंतराळ परिसंस्थेच्या लवचिकतेमध्ये भर घालण्यासाठी व्यापक अंतराळ सायबरसुरक्षा आराखडा आणि मार्गदर्शक तत्वे  तयार केली आहेत . 24 ते 26 फेब्रुवारी 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे झालेल्या डिफसॅट परिषद आणि एक्स्पो-2026 मध्ये ही मार्गदर्शक तत्वे प्रसिद्ध करण्यात आली.

ही मार्गदर्शक तत्त्वे सूचना स्वरूपात असून संपूर्ण अंतराळ क्षेत्र सायबरसुरक्षा सज्जतेत पुढे रहावे हा त्यामागील उद्देश आहे. सरकारी संस्था, उपग्रह सेवा पुरवठादार, ग्राउंड स्टेशन ऑपरेटर, उपकरणे पुरवठादार आणि खाजगी अंतराळ कंपन्या यासह अंतराळ परिसंस्थेशी संबंधित विविध भागधारकांना मदत व्हावी यासाठी विचारपूर्वक ही चौकट तयार करण्यात आली आहे. आवश्यक सायबरसुरक्षा तत्त्वे, सुचविण्यात आलेली नियंत्रणे आणि स्पष्टपणे परिभाषित केलेल्या जबाबदाऱ्या स्पष्ट करून या मार्गदर्शक तत्वांच्या  माध्यमातून  संपूर्ण क्षेत्रात लवचिकता, जबाबदारी आणि सक्रिय जोखीम व्यवस्थापनाची संस्कृती वाढवण्याचा प्रयत्न आहे.

सीइआरटी-इन चे महासंचालक डॉ. संजय बहल म्हणाले, "सीइआरटी-इन संपूर्ण भारतातील सर्व क्षेत्रांच्या सायबर लवचिकतेला बळकटी देण्याचे अढळपणे काम करत आहे. ही व्यापक मार्गदर्शक तत्त्वे उपग्रह दूसंचार नेटवर्कसोबतच भारताचे तांत्रिक सार्वभौमत्व आणि भविष्यातील प्रगतीत असलेले अंतराळ प्रणालींचे धोरणात्मक महत्त्व लक्षात घेण्याबरोबरच उपग्रह नेटवर्क, जमिनीवरील पायाभूत सुविधा, अंतराळाशी-संबंधित पुरवठा साखळी आणि अंतराळ मालमत्तांचे  वेगाने बदलत असलेल्या आणि वाढत्या प्रमाणात अत्याधुनिक होत असलेल्या सायबर धोक्यांपासून सर्व बाजूंनी संरक्षण करण्यासाठी एकीकृत आणि दूरदर्शी चौकट स्थापित करतात."

सुषमा काणे/मंजिरी गानू/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2233193) अभ्यागत कक्ष : 15