रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पारदर्शक आणि जलद एनओसी मंजुरीसाठी सुधारित ‘राजमार्ग प्रवेश’ पोर्टलचे केले उद्घाटन

Posted On: 25 FEB 2026 9:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2026

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राष्ट्रीय महामार्गालगत पेट्रोल पंप, वे-साईड सुविधा, खाजगी मालमत्ता, विश्रांती संकुल, जोड रस्ते आणि इतर  सुविधांसाठी ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळविण्याकरिता सुधारित ‘राजमार्ग प्रवेश’ वेब पोर्टलचे उद्घाटन केले.

व्यवसाय सुलभता वाढवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेनुसार, परवानग्या मिळविण्याची प्रक्रिया सोपी, जलद आणि अधिक पारदर्शक करण्यासाठी मंत्रालयाने हे सुधारित पोर्टल विकसित केले आहे. हे पोर्टल http://rajmargpravesh.morth.gov.in येथे पाहता येईल.

नवीन राजमार्ग प्रवेश पोर्टलद्वारे नागरिक, व्यवसाय आणि संस्था राष्ट्रीय महामार्गांवरून खाजगी मालमत्ता, उद्योग किंवा वे-साईड सुविधांसाठी प्रवेशाशी संबंधित परवानग्यांसाठी सोप्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकतात.  सरकारी आणि खाजगी संस्था राष्ट्रीय महामार्गांच्या कडेने किंवा पलीकडील बाजूस पाण्याच्या पाईपलाईन, गॅस पाईपलाईन, ऑप्टिकल फायबर केबल्स, वीज वाहिन्या आणि इतर सेवांसाठी परवानग्या मिळविण्याकरिता देखील या पोर्टलचा उपयोग करू शकतात.

हे नवीन पोर्टल मंजुरी प्रक्रिया अधिक सोयीस्कर, पारदर्शक आणि कालबद्ध करेल, ज्यामुळे नागरिक आणि व्यवसायांचा वेळ आणि श्रम वाचण्यास मदत होईल.

   

 

* * *

सुषमा काणे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2232900) अभ्यागत कक्ष : 8