रेल्वे मंत्रालय
सायबर फसवणुकीपासून सावध रहावे : रेल्वे निवृत्तीवेतनधारकांना घोटाळेबाजांपासून सावध राहण्याचे आवाहन
कोणताही रेल्वे अधिकारी समाज माध्यम किंवा कॉलद्वारे गोपनीय माहिती मागत नाही
संशयास्पद कॉल किंवा संदेशांची तक्रार तात्काळ पोलिस सायबर विभाग आणि संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे करावी
प्रविष्टि तिथि:
25 FEB 2026 6:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी 2026
काही सायबर फसवणूक करणारे ‘पीपीओ अपडेट्स’, केवायसी सत्यापन, अतिरिक्त पेन्शन लाभ इत्यादींच्या बहाण्याने रेल्वे अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फोन कॉल त्याचबरोबर एसएमएस/व्हॉट्सअॅप संदेश पाठवून याद्वारे वैयक्तिक आणि वित्तीय तपशील मागत असल्याचे निदर्शनाला आले आहे.
निवृत्तीवेतनधारकांना कळविण्यात येत आहे की, रेल्वेकडून पीपीओ किंवा सेवा रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी लिंक्स किंवा संदेश पाठवले जात नाही. कोणत्याही रेल्वे अधिकाऱ्याला फोन कॉल, एसएमएस, व्हॉट्सअॅप किंवा सोशल मीडियाद्वारे बँक तपशील, ओटीपी, पासवर्ड किंवा कोणतीही गोपनीय माहिती मागण्याचा अधिकार नाही.
निवृत्तीवेतनधारकांना सतर्क राहण्याचा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या संदर्भात जागरूक करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणताही संशयास्पद कॉल आल्यास किंवा संदेश आल्यास त्यासंबंधीची माहिती त्वरित पोलिस सायबर विभाग आणि संबंधित प्रशासकीय कार्यालयाला कळविण्यात यावी.
* * *
निलिमा चितळे/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2232799)
आगंतुक पटल : 91