पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नवोन्मेषासाठी प्रतिभा आणि कठोर परिश्रम यांच्या समन्वयातील महत्त्व अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक

Posted On: 24 FEB 2026 9:37AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक संस्कृत सुभाषित आपल्या ‘एक्स’ पोस्टवर सामायिक केले आहे. या सुभाषितात; नवोपक्रमातील यश हे प्रतिभा आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे परिपाक आहे, असे अधोरेखित केले आहे.

उत्तम परिणाम साध्य करण्यासाठी वैयक्तिक क्षमतेची पूर्तता कृतीने केली पाहिजे या कालातीत ज्ञानावर पंतप्रधानांनी भर दिले आहे. 

पंतप्रधानांनी दिलेला संदेश पुढीलप्रमाणे आहे:

यथैकेन न हस्तेन तालिका सम्प्रपद्यते।

तथोग्यमपरित्यक्तं न फलं कर्मण: स्मृतम्।।

"ज्याप्रमाणे एका हाताने टाळी वाजवता येत नाही, त्याचप्रमाणे नवोपक्रमातील यश प्रयत्नांशिवाय मिळणे शक्य नाही. प्रतिभेला कठोर परिश्रम आणि सतत कृतीची साथ मिळते, तेव्हाच यशाची फळे दिसू लागतात,” 

आपल्या ‘एक्स’ पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:

यथैकेन न हस्तेन तालिका सम्प्रपद्यते।

तथोद्यमपरित्यक्तं न फलं कर्मणः स्मृतम्॥

यथैकेन न हस्तेन तालिका सम्प्रपद्यते।

तथोद्यमपरित्यक्तं न फलं कर्मणः स्मृतम्॥ pic.twitter.com/0twbUYXXqZ

— Narendra Modi (@narendramodi) February 24, 2026

 ***

NitinFulluke / SampadaPatgaonkar / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2232010) अभ्यागत कक्ष : 18