राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती 24 ते 27 फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र, झारखंड आणि राजस्थानला भेट देणार

प्रविष्टि तिथि: 23 FEB 2026 7:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 फेब्रुवारी 2026

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 24 ते 27 फेब्रुवारी 2026 दरम्यान महाराष्ट्र, झारखंड आणि राजस्थानला भेट देतील.

24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती पीडी हिंदुजा रुग्णालयातर्फे मुंबईतील लोकभवन येथे आयोजित 'जीवनरक्षा आणि निरोगी भारत निर्माण' या देशव्यापी मोहिमेचे उद्घाटन करतील.

25 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती बुलढाणामधील शेगाव येथे केंद्रीय आयुष मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026' ला उपस्थित राहतील. त्याच दिवशी, त्या नागपूर येथे ब्रह्माकुमारी द्वारे  आयोजित  'एकता आणि विश्वासाच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सुवर्णकाळ' या राज्यस्तरीय उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील.

26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती जमशेदपूर येथील श्री जगन्नाथ आध्यात्मिक आणि सांस्कृतिक चॅरिटेबल सेंटर ट्रस्ट, जमशेदपूर द्वारे आयोजित श्री जगन्नाथ मंदिराच्या भूमिपूजन समारंभात सहभागी होतील. त्या जमशेदपूर येथील मणिपाल टाटा वैद्यकीय महाविद्यालयाला देखील  भेट देतील आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधतील.

27 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजस्थानमधील पोखरण येथे वायुशक्ती सरावाला उपस्थित  राहतील.

सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2231885) आगंतुक पटल : 134
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Malayalam