इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

कृत्रिम बुद्धिमत्ता संसाधने स्पष्टपणे परिभाषित जनहिताच्या परिणामांच्या दिशेने वळवणे आवश्यक असल्याचे इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मधील तज्ञांचे मत


समता, समावेशन आणि सार्वजनिक हित एआय परिवर्तनाचा भविष्यातील मार्ग निश्चित करणार

ग्राहक आणि निर्मात्यांसाठी एआय स्केलिंग हे प्रमुख धोरणात्मक आव्हान ठरणार

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्यासाठी आशियातील कौशल्य तफावत दूर करणे महत्वाचे असल्याचे तज्ञांचे प्रतिपादन

Posted On: 20 FEB 2026 2:42PM by PIB Mumbai

 

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मधील "बिल्डिंग पब्लिक इंटरेस्ट एआय: कॅटॅलिटिक फंडिंग फॉर इक्विटेबल अॅक्सेस टू कॉम्प्युट रिसोर्सेस" या सत्रात सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग यांनी "नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यासाठी संगणकीय संसाधने खुली करणे" या विषयावरील कार्यकारी अहवालाचे प्रकाशन केले. या चर्चासत्राच्या माध्यमातून वरिष्ठ सरकारी नेते, परोपकारी संस्था आणि जागतिक एआय तज्ञ  एकत्र आले आणि त्यांनी प्रोत्साहन निधी, नवीन संस्थात्मक मॉडेल्स आणि दक्षिण-दक्षिण सहकार्य ग्लोबल साऊथ साठी प्रगत संगणक सुलभ आणि परवडणारे कसे बनवू शकते यावर चर्चा केली.

या संभाषणात अधोरेखित करण्यात आले की प्रश्न आता डेटा सेंटर क्षमता निर्माण करण्यापुरता मर्यादित नाही, तर आरोग्य, शिक्षण आणि कृषी यासारख्या क्षेत्रांमध्ये सार्वजनिक हिताचे परिणाम स्पष्टपणे परिभाषित करण्यासाठी या संसाधनांचा वापर केला जातो याची खात्री करणे हा आहे. स्टार्टअप्स, संशोधक आणि सामाजिक क्षेत्रातील संस्थांसाठी संगणकीय प्रवेशाचे वास्तविक वापरात रूपांतर करण्यासाठी मागणीचे एकत्रीकरण, सामायिक पायाभूत सुविधा, कौशल्य विकास आणि मिशन-आधारित चौकटी महत्वाच्या असतील यावर वक्त्यांनी भर दिला.

 

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ. सौरभ गर्ग यांनी जागतिक एआय संक्रमणाच्या केंद्रस्थानी समतेला स्थान दिले आणि प्रगतीचे खरे मोजमाप सार्वजनिक उद्दिष्टाशी ती किती जोडलेली आहे, यावर अवलंबून असेल यावर भर दिला. ते म्हणाले, "कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जगात परिवर्तन होईल, असे आमचे सामूहिक मत आहे. मात्र हे परिवर्तन न्याय्य, समावेशक आणि सार्वजनिक हिताशी जोडलेले आहे का, हा मूळ प्रश्न आहे. सध्याच्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी हाच मुद्दा आहे."

एआय कोलॅबोरेटिव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन टिस्ने यांनी पायाभूत सुविधा आणि प्रभाव यांच्यातील वाढत्या तफावतीचा धोका अधोरेखित करत, क्षमता निर्मिती वास्तविक वापराशी जुळत नाही, अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगायला हवी, असे सांगितले. ते म्हणाले, "मला काळजी आहे की दोन वर्षांत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, की आपण ग्लोबल साउथसह अनेक देशांमध्ये संगणकीय क्षमता मिळवण्यात यशस्वी होऊ, परंतु त्या ठिकाणी डेटा सेंटरचा प्रभावीपणे वापर केला जात नसेल."

पॅट्रिक जे. मॅकगव्हर्न फाउंडेशनचे अध्यक्ष विलास धर यांनी धोरण, भांडवल आणि उपयोजन यांना मोठ्या प्रमाणात जोडण्यासाठी नवीन संस्थात्मक यंत्रणांची गरज अधोरेखित केली. प्रवेशयोग्यता केवळ बाजार शक्तींवर सोडून देता येणार नाही, असे ते म्हणाले. "ग्राहक आणि निर्मात्यांसाठी एआयचे विस्तारयोग्य सेवेत रूपांतर करणे हे केवळ उत्पादन आव्हान नसून ते एक धोरणात्मक आव्हान देखील आहे. ही प्रगती केवळ खाजगी बाजारपेठेतून किंवा आघाडीच्या स्वयंसेवी संस्थांना विकासक बनण्यास सांगून साध्य होणार नाही. पुढील 12 महिन्यांत आमचे काम म्हणजे या परिवर्तनाला मोठ्या प्रमाणावर आधार देणाऱ्या आणि सर्व घटकांना जोडणाऱ्या संस्थांच्या उभारणीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे," असे त्यांनी नमूद केले.

काला या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिकोह गिटाऊ यांनी, संगणकीय क्षमतेची मागणी स्पष्ट विकास उद्दिष्टांशी जोडलेली असावी आणि ती आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे समर्थित असावी, यावर भर दिला. "हे केवळ GPU उपलब्ध करून देण्याबद्दल नाही. आरोग्य, शिक्षण आणि शेती सारख्या क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी GPU कसा वापरला जातो हे महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या. जेव्हा तुमच्याकडे स्पष्ट वापर प्रकरणे असतात, तेव्हा GPU ची मागणी एक स्पष्ट कार्य बनते आणि ही दरी भरून काढण्यासाठी प्रशासनिक चौकट देखील अधिक स्पष्ट होते," असे त्यांनी सांगितले.

फिलॅन्थ्रॉफी एशिया फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी शॉन सीओ यांनी प्रगत संगणकीय सुविधांचा विस्तार करण्यासाठी मागणी एकत्रीकरण, मागणी एकत्रित करणे, सवलतीचे प्रवेश मॉडेल्स आणि कौशल्य विकास या महत्त्वाच्या घटकांवर प्रकाश टाकला. “जेव्हा तुम्ही नवीन क्लाउड्स किंवा सेवा म्हणून GPU च्या उदयाबद्दल विचार करता, तेव्हा सामाजिक प्रभाव आणि आर्थिक प्रगतीकरिता एआयची क्षमता मुक्त करण्यासाठी हे विकास सकारात्मक ठरतील. मात्र, स्टार्टअप्स आणि परिणामाभिमुख संस्थांसाठी आपण ते कसे अधिक सुलभ बनवू शकतो? यासाठी आपण ज्या परिसंस्थेची निर्मिती करत आहोत त्याबद्दल विचार करण्याची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले. आशियातील कौशल्यांमधील तफावत प्रत्यक्षात मोठी आहे आणि कदाचित हाच घटक आपल्याला या शक्तीचे खरोखर इष्टतमीकरण आणि जास्तीत जास्त वापर करण्यापासून रोखत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सत्रात एका अशा रोडमॅपची रूपरेषा आखण्यात आली ज्यामध्ये उत्प्रेरक सार्वजनिक आणि परोपकारी भांडवल, सामायिक संगणकीय पायाभूत सुविधा आणि परस्पर सुसंगत प्रशासनिक चौकट यांच्या सहाय्याने एआय’ला जागतिक सार्वजनिक हितसाधन म्हणून कार्य करण्यास सक्षम करू शकतात.

***

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/श्रद्धा मुखेडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2230911) अभ्यागत कक्ष : 5