राष्ट्रपती कार्यालय
सर्बियाच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट
Posted On:
19 FEB 2026 10:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026
सर्बिया प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांनी आज (19 फेब्रुवारी 2026) राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
राष्ट्रपती भवन येथे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर वुसिक यांचे स्वागत करताना राष्ट्रपतींनी जून 2023 मध्ये सर्बियाला दिलेल्या आपल्या भेटीबाबतच्या आठवणींना उजाळा दिला. त्या भेटीदरम्यान मिळालेल्या आदरातिथ्यासाठी त्यांनी राष्ट्राध्यक्ष वुसिक तसेच सर्बिया सरकारचे आभार मानले.

राष्ट्रपतींनी नमूद केले की, अलिप्ततावादी चळवळीचे सहसंस्थापक देश म्हणून सुरू झालेला भारत आणि सर्बिया यांचा प्रवास आज ‘ग्लोबल साऊथ’मधील भागीदार म्हणून पुढे सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये विशेष मैत्रीपूर्ण संबंध असून, ग्लोबल साऊथमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची क्षमता दोन्ही देशांकडे आहे.
राष्ट्रपतींनी पुढे सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील भारत व सर्बियाची क्षमता लक्षात घेता या क्षेत्रात सहकार्य अधिक दृढ करण्याची संधी आहे. तसेच द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्यासाठीही व्यापक संधी उपलब्ध आहेत. माहिती तंत्रज्ञान, उत्पादन क्षेत्र, शेती, जैवतंत्रज्ञान, औषधनिर्मिती, पर्यटन आणि शिक्षण ही क्षेत्रे आगामी काळात द्विपक्षीय सहकार्याची महत्त्वाची आधारस्तंभ ठरू शकतात.

दोन्ही नेत्यांनी भारत आणि सर्बिया यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक व्यापक व बळकट करण्यासाठी मोठी क्षमता असल्याचे मान्य केले. परस्पर लाभ व समृद्धीसाठी सहकार्य पुढेही कायम ठेवण्यावर त्यांनी भर दिला.
सोनाली काकडे/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
(Release ID: 2230539)
अभ्यागत कक्ष : 7