इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या धोरणात्मक मेळाव्यात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मांडली उत्पादन अभियांत्रिकी तंत्रज्ञानासाठी (एमईटी) भारताच्या एआय प्राधान्यांची रूपरेषा
Posted On:
18 FEB 2026 10:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2026
अवलंब, कौशल्य विकास आणि समावेशक वाढ हे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून भारताच्या विशेषतः मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी (एमईटी) इकोसिस्टमसाठी सुस्पष्ट एआय प्राधान्ये ठरविण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्योग नेते आणि जागतिक शिक्षणतज्ज्ञ, धोरणकर्ते आणि तंत्रज्ञान तज्ञांची धोरणात्मक बैठक पार पडली.
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) अखत्यारितील नॅमटेकने इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये विचारपूर्वकपणे या बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (आयआयटी-एम) आणि इतर प्रमुख विद्यापीठांमधील शिक्षणतज्ज्ञांसह मायक्रोसॉफ्ट इंडिया, डेल टेक्नॉलॉजीज, सिस्को इंडिया, हिताची इंडिया, टाटा इलेक्ट्रॉनिक्स, रॉकवेल ऑटोमेशन, पालो अल्टो नेटवर्क्स, पे पाल आणि इंटेल यासारख्या उद्योग क्षेत्रातील नामांकित वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
या कार्यक्रमात माननीय मंत्री यांच्या हस्ते अश्विनी वैष्णव यांनी "उत्पादन, अभियांत्रिकी तंत्रज्ञानासाठी एआय (एआय-एमईटी)" या विषयावरील श्वेतपत्रिका संकल्पना सादर केली केले. श्वेतपत्रिका संकल्पना उत्पादकता, शाश्वतता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादन आणि संबंधित मूल्य साखळींमध्ये एआय अंतर्भूत करण्यासाठी एक धोरणात्मक चौकट सादर करते.
या प्रसंगी बोलताना अश्विनी वैष्णव म्हणाले, "कृत्रिम बुद्धिमत्ता हा विकसित भारताच्या दिशेने भारताच्या प्रवासातील मूलभूत आधारस्तंभ आहे. उत्पादन अभियांत्रिकी तंत्रज्ञानात एआयचा अंतर्भाव करून, आपण उत्पादकता वाढवू शकतो, स्पर्धात्मकता बळकट करू शकतो तसेच नवोन्मेष आणि उद्योजकतेसाठी नवीन संधी खुल्या करू शकतो. भारतातील कार्यबल भविष्यासाठी तयार करण्यासोबतच उद्योग आणि एमएसएमईंना सारखेच सक्षम बनवणारी समावेशक एआय परिसंस्था निर्माण करणे या मुख्य ध्येयाकडे आमचे लक्ष आहे. एआय-एमईटी श्वेतपत्रिकासारख्या उपक्रमातून तांत्रिक क्षमतांचे प्रत्यक्ष परिणामांमध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक असलेला सहकार्यात्मक, ध्येय-चालित दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो. या सामायिक राष्ट्रीय ध्येयासाठी नॅमटेकने उद्योग, शैक्षणिक संस्था आणि धोरणकर्त्यांना एकत्र आणण्यात पुढाकार घेतला या गोष्टीचा मला आनंद आहे. भारत प्रीसिजन उपकरणांचा प्रमुख उत्पादक म्हणून उदयास यावा यासाठी पुढील स्तरावरील प्रतिभा विकसित करण्यासाठी या संधीचा उपयोग करून घ्यावा अशी नॅमटेकला माझी विनंती आहे."
* * *
शैलेश पाटील/मंजिरी गानू/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2230032)
अभ्यागत कक्ष : 12