राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू ची पाहणी


भारताचा असा विश्वास आहे की एक मजबूत सागरी व्यवस्था, ही सामूहिक जबाबदारी आणि समविचारी भागीदारांमधील सहकार्यात्मक कृतीवर आधारित आहे: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 18 FEB 2026 6:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 फेब्रुवारी 2026

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (18 फेब्रुवारी 2026) आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूची पाहणी केली. ‘इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू, 2026’ मध्ये 70 हून अधिक देशांची नौदले सहभागी झाली आहेत.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू हा सागरी परंपरांबद्दल विविध राष्ट्रांमधील एकता, विश्वास आणि आदर प्रतिबिंबित करतो. वेगवेगळे ध्वज असलेली जहाजे आणि विविध देशांचे खलाशी एकतेची भावना प्रदर्शित करतात. एकजुटीची ही भावना, 'युनायटेड थ्रू ओशन्स' या पुनरावलोकनाच्या संकल्पनेत मांडण्यात आली आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. या सामूहिक नौदल सामर्थ्याची वचनबद्धता आणि निर्धार सर्व आव्हानांवर मात करू शकतो, हा जागतिक समुदायासाठी एक सकारात्मक संदेश आहे, असे त्या म्हणाल्या.

सागरी क्षेत्रासह आंतरराष्ट्रीय संबंधांकडे पाहण्याचा भारताचा दृष्टीकोन 'वसुधैव कुटुंबकम' किंवा 'जग एक कुटुंब आहे' या मूल्यांवर आधारित आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. हा दृष्टीकोन असा   व्यावहारिक विचार मांडतो की, भागीदारीतून जागतिक सुरक्षा आणि विकास, शाश्वतता आणि स्थैर्य निर्माण होते. भागीदारीची ही भावना शाश्वत जागतिक व्यवस्थेचा पाया आहे. भारताचा असा विश्वास आहे की एक मजबूत सागरी व्यवस्था, ही सामूहिक जबाबदारी आणि समविचारी भागीदारांमधील सहकार्यात्मक कृतीवर आधारित आहे. त्या म्हणाल्या की, हा फ्लीट रिव्ह्यू भारताच्या ‘महासागर’ हा दृष्टीकोन देखील पुढे नेत आहे, ज्याचा अर्थ संपूर्ण प्रदेशाची सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि सर्वांगीण प्रगती, हा आहे, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपतींनी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या परदेशी नौदलातील अधिकारी आणि खलाशांची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या की हे जवान त्यांची सेवा आणि त्यांच्या राष्ट्रांच्या सर्वोत्तम परंपरांचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची शिस्त, समर्पण आणि क्षमता हा सामूहिक सागरी सुरक्षेचा पाया आहे. फ्लीट रिव्ह्यूमधील त्यांच्या उपस्थितीमुळे आपले विश्वासाचे बंध अधिक दृढ झाले आहेत आणि महासागरातील शांतता, स्थैर्य आणि सहकार्याप्रति आपली सामायिक वचनबद्धता पुन्हा सिद्ध झाली आहे, असे त्या म्हणाल्या.

    

या फ्लीट रिव्ह्यूमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारी सर्व नौदले एकत्रितपणे जागतिक समुदायाचा विकास, समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणाला चालना देणारा घटक म्हणून महासागरांची भरभराट करण्यात सहाय्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

* * *

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2229809) अभ्यागत कक्ष : 12