संरक्षण मंत्रालय
भारतीय तट रक्षक दल आणि गुजरात एटीएस ने 203 किलो अमली पदार्थसदृश घेऊन जाणारी स्पीड बोट घेतली ताब्यात
Posted On:
17 FEB 2026 7:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी 2026
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे केलेल्या एका वेगवान व समन्वित कारवाईत अरबी समुद्रात आंतरराष्ट्रीय सागरी सीमारेषेजवळ 203 किलो संदिग्ध स्फटिकसदृश्य अमली पदार्थ घेऊन जाणारी एक स्पीड बोट पकडली.
गुजरात दहशतवाद विरोधी पथकाकडून एक गुप्तसूचना मिळाल्यावर वायव्य तटरक्षक क्षेत्रात तैनात असलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या एका जहाजाला तातडीने मार्ग बदलून बेकायदेशीर अमली पदार्थाची तस्करी करत असल्याचा संशय असलेल्या एका परदेशी मासेमारी जहाजाला अडविण्याचे आदेश देण्यात आले.
अवघड परिस्थितीचा सामना करत भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाने मिळालेल्या खबरीच्या आधारे व तांत्रिक देखरेख यंत्रणेच्या साहाय्याने या संशयित बोटीला शोधून काढले. तसेच पलायन करणाऱ्या त्या स्पीड बोटीचा पाठलाग करत तिला अडवले . संशयित बोटीवर दलाचे अधिकारी चढल्यावर त्याना तिथे 2 परदेशी कर्मचारी सापडले. बोटीची झडती घेतल्यानंतर त्यांना स्फटिकसदृश्य संशयित अमली पदार्थ असलेली प्रत्येकी एक किलो वजनाची 203 पाकिटे सापडली.
जप्त केलेल्या संशयित मालासोबत ताब्यात घेतलेली स्पीडबोट व त्यावरील कर्मचारी पुढील चौकशीसाठी व मालाच्या सखोल रासायनिक चाचणीसाठी पोरबंदर येथे आणण्यात आले आहेत.
निलीमा चितळे/उमा रायकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2229258)
अभ्यागत कक्ष : 12