माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav AI Impact Summit 2026

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये भारतीय एआय आणि गेमिंग स्टार्टअप्स ठरले आकर्षणाचा केंद्रबिंदू


पाच भारतीय स्टार्टअप्स एआय-चलित गेम्स आणि गुंतवून ठेवणाऱ्या नावीन्यपूर्ण प्रयोगांचे दर्शन घडविणार

Posted On: 16 FEB 2026 6:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2026

 

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026, ही कृत्रीम प्रज्ञा अर्थात एआय या विषयावरील प्रमुख जागतिक परिषद असून त्यामध्ये सरकारे, तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी, स्टार्टअप्स, गुंतवणूकदार, संशोधक आणि धोरणकर्ते एकत्र येऊन विविध उद्योगांवर होणाऱ्या एआयच्या परिवर्तनात्मक परिणामांवर विचारमंथन करण्यासाठी सज्ज आहेत. वास्तव जगातील एआय अ‍ॅप्लिकेशन्सचे सादर करण्याचे आणि जागतिक सहकार्याला चालना देण्यासाठीचे प्रमुख व्यासपीठ असे स्थान प्राप्त झालेली ही शिखर परिषद एआय-चालित नवोन्मेषाचे आघाडीचे केंद्र म्हणून निर्माण होत असलेली भारताची प्रतिमा आणखी बळकट करणारी आहे.

गेमिंग आणि इंटरॅक्टिव्ह तंत्रज्ञान श्रेणी अंतर्गत, येस्ग्नोम, मेटास्पोर्टस (हिटविकेट), कोयोझो, युथ बझ (ऑरकॅडियम) आणि इव्हेव्ह हे पाच अग्रगण्य भारतीय स्टार्टअप्स, एआय, गेमिंग, इमर्सिव्ह मीडिया आणि उद्योगातील परिवर्तनाच्या वळणाच्या टप्प्यात भारत अधिकाधिक अग्रस्थान पटकावत असल्याची बाब अधोरेखित करणाऱ्या अत्याधुनिक एआय-चलित उपायांचे दर्शन घडवतील.

एआयच्या आधारे सर्जनशील निर्मिती

येस्ग्नोम  गेम स्टुडिओ आणि सर्जनशील संघांसाठी बनवलेला आपला स्केटली एआय हा कला निर्मिती प्लॅटफॉर्म सादर करेल. हा प्लॅटफॉर्म उत्पादन सुरू करता येईल अशा गेम मालमत्तांची निर्मिती करण्यासाठी सहाय्यक ठरणारा असून त्यामध्ये गती, सुसंगतता आणि शैलीदार नियंत्रणासोबत कॅरेक्टर डिझाइन, वातावरण, युआय घटक, कथानक आणि अ‍ॅनिमेशन घटकांचा समावेश आहे.

त्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे स्टुडिओंना मोठ्या प्रमाणात उत्पादनांमध्ये सुसंगती राखण्यासाठी निश्चितपणे परिभाषित केलेल्या दृश्य सौंदर्यशास्त्राचे एआयला प्रशिक्षण देण्याची मुभा देणारी स्वतःची अशी खास शैली प्रशिक्षण प्रणाली हे होय. जलद पुनरावृत्ती, स्प्राइट शीट निर्मिती, मालमत्तेत अधिकाधिक वाढ आणि विस्तार साधनांच्या बाबतीत सक्षम करण्यासोबतच अडथळे कमी करून एआय

उत्पादन कार्यप्रवाह सुरळित करण्यास तसेच भारतीय टीम आणि जागतिक स्टुडिओ दोघांनाही सर्जनशील निर्मिती वाढविण्यास सक्षम बनविणे हा स्केटलीचा उद्देश आहे.

लाईव्ह स्पोर्ट्स गेम्समध्ये जनरेटिव्ह एआय

मेटास्पोर्ट्स जगभरात 18 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते असलेला हिटविकेट हा स्पर्धात्मक मल्टीप्लेअर क्रिकेट गेम सादर करणार आहे. शिखर परिषदेत, कंपनी आपले जनरेटिव्ह एआय-चलित रिअल-टाइम कमेंट्री इंजिन प्रदर्शित करेल.

ही प्रणाली लाइव्ह गेम परिस्थितींचे विश्लेषण करते, त्या संदर्भातील लिखित स्वरुपात भाष्य तयार करून त्याचे अभिवाचन स्वरुपातील व्हॉइस आउटपुटमध्ये रूपांतर करते, प्रत्येक सामन्यासाठी वैयक्तिकृत कथनाचा अनुभव मिळवून देते. लाइव्ह खेळाला एआय-आधारित कथाकथनाची जोड देऊन, जनरेटिव्ह एआय मोबाइल गेममध्ये अधिक गुंतवून ठेवणारी प्रसारण-गुणवत्ता, वैयक्तिकरण आणि परस्परसंवाद कसा वाढवू शकते हे हिटविकेट दाखवून देते.

कन्सोल-ग्रेड मोबाइल गेमिंग इकोसिस्टम

कोयोझो स्मार्टफोन्सचे कन्सोल-च्या दर्जाच्या गेमिंग डिव्हाइसेसमध्ये रूपांतरित करण्यासाठी डिझाइन केलेली आपली एकात्मिक मोबाइल हँडहेल्ड गेमिंग इकोसिस्टमचे प्रदर्शित करेल.

कोयोझो वन या सर्वात महत्त्वाच्या हार्डवेअरमध्ये हॉल-इफेक्ट जॉयस्टिक आणि ट्रिगर्स, ड्युअल कनेक्टिव्हिटी (टाइप-सी आणि ब्लूटूथ), हॅप्टिक फीडबॅक, मॉड्यूलर अ‍ॅक्सेसरी सपोर्ट आणि पास-थ्रू चार्जिंगची वैशिष्ट्ये आहेत. हे डिव्हाइस  कोयोझो क्लब या इंटेलिजंट प्लॅटफॉर्म लेयरसाठी पूरक असून त्यामध्ये स्वयंचलित बटण मॅपिंग, गेम डिस्कव्हरी, रिमोट प्ले इंटिग्रेशन, परफॉर्मन्स इनसाइट्स आणि वैयक्तिकृत नियंत्रण प्रोफाइल अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

एकत्रितपणे, स्पर्धात्मक खेळ आणि वापरकर्त्याला गुंतवून ठेवण्याच्या दृष्टीने अत्यंत सुविहितपणे, उच्च-कार्यक्षमता हँडहेल्ड गेमिंग अनुभव प्रदान करून भारताच्या मोबाइल गेमिंग बाजारपेठेतील विखंडीत स्वरूप दूर करणे हे या इकोसिस्टमचे उद्दिष्ट आहे.

मानव विरुद्ध एआय: परस्परसंवादी प्रात्यक्षिक

युथ बझ, आपल्या ओरकॅडियम या इमर्सिव्ह टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्मद्वारे, "मॅन व्हर्सेस जीपीटी" हा परस्परसंवादी गेमिंग अनुभव सादर करणार असून तो मानवी सर्जनशीलता आणि एआय अनुकूलन यांच्यात विकसित होत असलेल्या संबंधांचा शोध घेतो.

लाईव्ह सादरीकरणात मानव सहभागी कृत्रिम बुद्धिमत्ता-सक्षम प्रतिस्पर्ध्यांशी स्पर्धा करतात. हे कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली वर्तन नमुने आणि रिअल-टाइम निर्णय प्रक्रियेच्या मदतीने वेगवेगळ्या फेऱ्यांमध्ये शिकतात आणि स्वतःला जुळवून घेतात. प्रेक्षकांना अनुकूल स्वरूप म्हणून डिझाइन केलेले, हा अनुभव जटिल एआय संकल्पनांना आकर्षक गेमप्लेमध्ये सुलभ करतो, प्रेक्षकांसाठी सुलभ अशा स्वरूपात तयार केलेल्या या अनुभवामध्ये गुंतागुंतीच्या कृत्रिम बुद्धिमत्ता संकल्पना आकर्षक आणि सहभागात्मक खेळाच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने मांडल्या जातात.

अनुकूल अडचण प्रणाली आणि बुद्धिमान परस्परसंवाद मॉडेल्सचे प्रात्यक्षिक सादर करत, “मेड-इन-इंडिया” बौद्धिक संपदा असलेला हा उपक्रम आहे. विस्तारणाऱ्या डिजिटल परिसंस्थेमध्ये मौलिक आणि मूळ समरस मनोरंजन स्वरूपांच्या निर्मितीकडे सुरु असलेल्या भारताच्या वाटचालीवर हे  सादरीकरण भर देते.

संज्ञानात्मक कृत्रिम बुद्धिमत्ता सज्जतेचे मूल्यांकन

इव्हेव्ह  ही जागतिक स्तरावरील बिहेव्हियरल इंटेलिजन्स आणि ऑर्गनायझेशनल ट्रान्सफॉर्मेशन प्रयोगशाळा शिखर परिषदेत आपल्या एंटरप्राइझ कॉग्निटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्ता सज्जता उपकरणाचे प्रथम अनावरण करणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता स्वीकार प्रक्रियेमधील “मानवी संज्ञानात्मक पायाभूत संरचना”  यातील तफावतीकडे  लक्ष वेधणे हा या उपकरणाचा मुख्य उद्देश आहे.

न्यूरोसायन्स-आधारित AFERR मॉडेल सक्रियता, पूर्वानुमान, प्रयोगशीलता, जाणीव आणि विचार यावर आधारित हे साधन पारंपरिक तांत्रिक तपासणी सूचींपलीकडे जाऊन नेतृत्व आणि संघटनात्मक सज्जतेचे मूल्यमापन करते. नेते समस्यांकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतात, निर्णय कसे घेतात आणि बुद्धिमान प्रणालींसोबत कार्य करताना स्वतःला कसे जुळवून घेतात, याचे सखोल मूल्यांकन या साधनाद्वारे केले जाते.

हे दालन एक लाईव्ह डायग्नोस्टिक प्रयोगशाळा म्हणून कार्य करेल, जिथे धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील नेते कार्यकारी सिम्युलेशन्समध्ये सहभागी होऊ शकतील. कंपनी शिखर परिषदेदरम्यान एआय नेतृत्व तयारीचे मोजमाप करणारा “"स्टेट ऑफ कॉग्निशन: इंडिया एआय स्नॅपशॉट 2026” हा अहवालही सादर करणार आहे, ज्यामध्ये भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता नेतृत्व सज्जतेचे प्रत्यक्ष मोजमाप केले जाईल.

भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता गेमिंग क्षेत्राच्या भविष्यात गुंतवणूक

“सोन्याची नवी उसळी : भारताच्या एआय-संचालित गेमिंग भविष्यात गुंतवणूक” या विशेष परिसंवादाचे आयोजन गेम डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे. या सत्रामध्ये जागतिक गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रातील नेते एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित गेम विकास आणि परस्परसंवादी माध्यमांमध्ये भारताच्या वाढत्या प्रभावावर चर्चा करतील.

या सत्रात गुंतवणुकीचे बदलते कल, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उत्पादन मॉडेल्स, कौशल्यप्रदान उपक्रम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता चलित गेमिंग नवोन्मेषात एक जागतिक शक्तिकेंद्र म्हणून भारताच्या उदयाला चालना देण्यासाठी आवश्यक धोरण चौकट, यासर्वांचे परीक्षण केले जाईल.

या पाच स्टार्टअप्स मधील सहभागी  भारताच्या विस्तारणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित गेमिंग क्षेत्र, सखोल अनुभव, संज्ञानात्मक परिवर्तन आणि परस्परसंवादी कथाकथनात भारताच्या वाढत्या क्षमता अधोरेखित करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषद 2026  मधील त्यांचा सहभाग जागतिक स्तरावर स्पर्धात्मक, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित प्लॅटफॉर्म्स उभारण्याच्या आणि पुढील पिढीतील डिजिटल नवोन्मेषामध्ये भारताला आघाडीवर ठेवण्याची  व्यापक राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करतो.

 

* * *

निलिमा चितळे/मंजिरी गानू/भक्‍ती सोनटक्‍के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2228800) अभ्यागत कक्ष : 26