संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय नौदलाकडून विशाखापट्टणमच्या मिलन 2026 सरावाचा भाग असलेल्या मिलन ग्रामचे उद्घाटन

Posted On: 16 FEB 2026 3:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2026

 

पूर्व नौदल मुख्यालयात 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय नौदलाने त्यांच्या मिलन 2026 या प्रमुख आंतरराष्ट्रीय नौदल कवायतींचा भाग असलेल्या मिलन ग्रामचे उद्घाटन केले. या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान पूर्व नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडर इन चीफ वाईस अॅडमिरल संजय भल्ला यांनी भूषविले. त्यांनी सहभागी नौदलासाठी हे ग्राम औपचारिकपणे खुले केले आणि जागतिक सागरी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणच्या सुविधांची पाहणी केली. 

अतिशय विचारपूर्वक साकारलेल्या मिलन ग्रामची संकल्पना आणि आखणी अनुभव क्षेत्र म्हणून केलेली आहे. जेथे 70 हून अधिक देशांतील प्रतिनिधी आणि नौदल अधिकारी मैत्री व सहकार्याच्या वातावरणात एकत्र येतात. हे केंद्र सामाजिक व सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी महत्त्वपूर्ण मंच म्हणून कार्य करते आणि व्यावसायिक परिघाच्या पलीकडे जाऊन परस्पर संवाद व सखोल सहभागास प्रोत्साहन देते.

मिलन ग्रामचे सांस्कृतिक वैशिष्ट्य म्हणजे भारताची वैविध्यपूर्ण संस्कृती आणि परंपरा यावर भर देत होणारे सांस्कृतिक आदानप्रदान. गायन तसेच पारंपारिक लोकनृत्यांचे सादरीकरण आणि सांस्कृतिक वातावरण यामध्ये भारताची तेजस्वी कलापरंपरेचे प्रतिबिंब आहे.

नौदलाशी संबधित सोवेनियर्स, हस्तकला आणि हातमागावरची वैविध्यपूर्ण उत्पादने असणारे विविध स्टॉल्स या विलेजमध्ये आहेत. याशिवाय भेट देणाऱ्यांसाठी चविष्ट भारतीय खाद्यपदार्थ, आणि स्थानिक स्वाद यांची वैविध्यपूर्ण श्रेणी सादर केली आहे.

फ्लॅग ऑफिसर कमांडर इन चीफ वाईस अॅडमिरल  यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले की, “मिलन ग्राम हे मैत्रीपूर्ण आणि सांस्कृतिक बंधाचे प्रतिक आहे ज्यातून व्यावसायिक नौदल सहभागाला पुष्टी मिळते. विशाखापट्टण हे आयएफआर, मिलन, आयओएनएस या उपक्रमांचे अल्प कालावधीत आयोजन होत असल्याने, भारताच्या सागरी क्षेत्रातील प्रभावाची आणि भागीदार देशांच्या एकत्रित सहभागाची पुष्टी करणारा हा एक महत्वाचा क्षण आहे.”

मिलन ग्रामचे उद्घाटन हे भारतीय नौदलाकडून विशाखापट्ट्णम येथे आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक कार्यक्रमांची सुरुवात देखील दर्शवते. 15 ते 25 फेब्रुवारी 2026 या दरम्यान मिलन 2026 सरावाची सुरुवात होईल. हा सराव तसेच आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यु 2026 आणि राष्ट्रप्रमुखांची आयओएनएस परिषद उपक्रम भारताच्या ऐतिहासिक सागरी केंद्राभिमुखतेची साक्ष आहे. इंडो-पॅसिफिकमधील सर्वात मोठ्या बहुपक्षीय नौदल सरावांपैकी एक म्हणून, मिलन 2026 जगभरातील नौदलांना एकत्र आणून आंतरकार्यक्षमता, सागरी क्षेत्र जागरूकता आणि सामूहिक प्रतिसाद क्षमता मजबूत करेल. या सरावाच्या बंदर आणि सागरी टप्प्यांमध्ये पाणबुडीविरोधी युद्ध, हवाई संरक्षण, शोध आणि बचाव आणि सहकारी सुरक्षा मोहिमांसह जटील सागरी मोहिमांवर लक्ष केंद्रित केले जाईल, ज्यामुळे मुक्त, खुल्या, सर्वसमावेशक आणि नियम-आधारित सागर यासंबधी वचनबद्धता दृढ होईल. पंतप्रधानांच्या 'महासागर' या दूरदृष्टीचे एक प्रमुख कार्यान्वित प्रकटीकरण आहे. विश्वासपात्र सुरक्षा भागीदार आणि जागतिक सागरी प्रदेशातील सर्वांचा एक जबाबदार भागधारक म्हणून भारताच्या भूमिकेचा त्यातून पुनरुच्चार होतो.

मिलान 2026 च्या सांस्कृतिक केंद्रबिंदूच्या स्वरुपात मिलन ग्राम "मैत्रीभाव, सहकार्य आणि सहयोग" या संकल्पनेचे प्रभावी प्रतीक आहे. हे परस्पर सांस्कृतिक देवाणघेवाण, मैत्रीचे सेतू निर्माण करणे आणि सामूहिक सागरी भागीदारी निर्माण करण्यासाठी सहभागी नौदलांच्या सामायिक वचनबद्धतेचे प्रतीक आहे.

 

* * *

नितीन फुल्लुके/विजया सहजराव/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2228688) अभ्यागत कक्ष : 21