उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी 1998 मधील कोयंबतूर स्फोटातील मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली
प्रविष्टि तिथि:
14 FEB 2026 8:27AM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज 14 फेब्रुवारी 1998 रोजी कोयंबतूर येथे झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. हे स्फोट राष्ट्राच्या इतिहासातील काळा आणि वेदनादायी अध्याय असल्याचे त्यांनी, सामाजिक माध्यमांवरील एका संदेशात म्हटले आहे.
त्या दिवसाची आठवण काढताना उप्राष्ट्रपतींनी सांगितले की, त्या वेळी लालकृष्ण आडवाणी शहराच्या दौऱ्यावर आले असताना कोयंबतूरमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाले आणि असंख्य कुटुंबांवर त्याच्या खोल जखमांचे व्रण उमटले. त्या काळात निर्माण झालेल्या भीती, दुःख आणि अनिश्चिततेच्या वातावरणाची आठवण आजही त्यांच्या मनात तीव्रपणे कोरलेली असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्फोटांपैकी एका स्फोटातून स्वतः थोडक्यात वाचल्याची आठवण सांगताना त्यांनी म्हटले की, जखमींना वाचवण्यासाठी धडपड आणि गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी झालेली धावपळ ते भयंकर क्षण त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी काळांपैकी एक म्हणून आजही स्मरणात आहेत.
भारताच्या दहशतवादाविरोधातील ठाम भूमिकेवर भर देत, सर्वांनी दहशतवादाविरोधात एकजुटीने उभे राहण्याचा आणि शांतता, सौहार्द तसेच राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा सामूहिक संकल्प दृढ करण्याचे उपराष्ट्रपतींनी आवाहन केले.
***
हर्षल आकुडे/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2228033)
आगंतुक पटल : 53