पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बांगलादेश निवडणुकीतील विजयाबद्दल तारिक रहमान यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन ;  द्विपक्षीय संबंधांविषयी  भारताच्या वचनबद्धतेचा केला पुनरुच्चार

Posted On: 13 FEB 2026 4:40PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तारिक रहमान यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि बांगलादेशच्या निवडणुकीत मिळालेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

संभाषणादरम्यान, पंतप्रधानांनी बांगलादेशच्या जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या  रहमान यांच्या प्रयत्नांना शुभेच्छा आणि पाठिंबा दिला.

उभय देशांमधील घनिष्ठ आणि मैत्रीपूर्ण संबंधांवर प्रकाश टाकताना, पंतप्रधानांनी नमूद केले की,  भारत आणि बांगलादेश हे खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांनी बांधलेले जवळचे शेजारी आहेत. दोन्ही देश आणि तेथील जनतेला शांतता, प्रगती आणि समृद्धी मिळवून देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्‍यमावर पोस्ट केले आहे:

"तारिक रहमान यांच्याशी बोलून आनंद झाला. बांगलादेशच्या निवडणुकीत मिळालेल्या उल्लेखनीय विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन केले.

बांगलादेशातील जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मी शुभेच्छा आणि पाठिंबा दर्शवला.

खोलवर रुजलेले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध असलेले दोन जवळचे शेजारी म्हणून, मी दोन्ही देशांच्या जनतेला शांतता, प्रगती आणि समृद्धी मिळवून देण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार केला.

@trahmanbnp”

***

सुवर्णा बेडेकर/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227751) अभ्यागत कक्ष : 15