भूविज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संसद प्रश्नोत्तरे: हवामान केंद्रांची स्थापना

Posted On: 12 FEB 2026 5:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 फेब्रुवारी 2026

 

गेल्या वर्षभरात, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) संपूर्ण भारतात 3 डॉपलर वेदर रडार (डीडब्ल्यूआर) (रायपूर आणि मंगळुरु  येथे 2 C-बँड रडार आणि जोरहाट, आसाम येथे एक X-बँड डीडब्ल्यूआर आणि 200 स्वयंचलित हवामान केंद्रे (एडब्ल्यूएस) स्थापित केली आहेत.

सध्याच्या 48 डीडब्ल्यूआरच्या  नेटवर्कअंतर्गत देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे 92 भाग समाविष्ट असून देशभरातील किनारी, डोंगराळ आणि बेट प्रदेशांमधील डीडब्ल्यूआर कव्हरेजमध्ये काही तफावत आहे. हिमालयीन प्रदेशात रडार देखरेख वाढवण्यासाठी, आयएमडीने पश्चिम हिमालयीन प्रदेशात लेह, बनिहाल टॉप, जम्मू, श्रीनगर, लॅन्सडाउन, मुक्तेश्वर, सुरकांडा देवी, जोत, मुरारी देवी, कुफरी येथे एकूण 10 डीडब्ल्यूआर स्थापन केले असून ते वास्तविक वेळेत कार्यरत आहेत. पूर्व हिमालयीन प्रदेशात, सध्या मोहनबारी, चेरापुंजी, अगरतळा, जोरहाट येथे रडार कार्यरत आहेत. किनारपट्टी असलेल्या राज्यांमध्ये, पश्चिम किनाऱ्यावरील तिरुवअनंतपुरम, कोची, मंगलोर, मुंबई, वेरावली, मुंबई (जुहू), मुंबई (पनवेल), मुंबई (कल्याण), मुंबई (वसई), गोवा आणि भुज येथे 11 रडार कार्यरत आहेत तर पूर्व किनारपट्टीवर  चेन्नई, गोपाळपूर, पारादीप, कराईकल, एनआयओटी चेन्नई, मछलीपट्टणम, विशाखापट्टणम, श्रीहरीकोटा (इस्रो) येथे 8 रडार कार्यरत आहेत.

कोणताही मोठा विलंब झालेला नसला तरी काही बाबतीत तांत्रिकदृष्ट्या योग्य जागा आणि संबंधित सुविधांच्या अनुपलब्धतेमुळे विलंब झाला आहे. सध्या, खाजगी किंवा शैक्षणिक नेटवर्क्सकडून उपलब्ध असलेल्या डेटाचा वापर करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.

सध्याचे डीडब्ल्यूआर नेटवर्कमध्ये देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या जवळपास 92% भाग समाविष्ट आहे. शिवाय, हवामान आणि जल मंत्रालय "हवामान माहिती नेटवर्क आणि डेटा सिस्टम" (विंड्स) अंतर्गत स्वयंचलित हवामान केंद्रे (एडब्ल्यूएस) स्थापन करण्यासाठी राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे त्यामुळे गट/तहसील पातळीवर एडब्ल्यूएसचे देशव्यापी नेटवर्क आणि ग्रामपंचायत पातळीवर स्वयंचलित पर्जन्यमापक (एआरजी) स्थापन करून संपूर्ण देशभराचा भूभाग सामावला जाऊ शकेल.

केंद्रीय भू- विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) डॉ. जितेंद्र सिंग यांनी 12 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यसभेत  ही माहिती सादर केली.

 

* * *

सुषमा काणे/मंजिरी गानू/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2227130) अभ्यागत कक्ष : 17