आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारतात औषध-प्रतिरोधक क्षयरोगावर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व-मौखिक उपचार पद्धती किफायतशीर पण परिणामकारक: आयसीएमआर अभ्यास

Posted On: 12 FEB 2026 2:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 फेब्रुवारी 2026

 

बहुऔषध-प्रतिरोधक आणि रिफाम्पिसिन-प्रतिरोधक क्षयरोगावर (MDR/RR-TB) कमी म्हणजे सहा महिन्यांच्या कालावधीच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व-मौखिक उपचार पद्धती किफायतशीर असून त्या सध्या भारतात वापरल्या जाणाऱ्या दीर्घ उपचार पद्धतींच्या तुलनेत त्यांचे आरोग्यावर अधिक चांगले परिणाम होत असल्याचे इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या आर्थिक मूल्यमापनातून दिसून आले आहे .

आयसीएमआर - राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था (आयसीएमआर-एनआयआरटी) द्वारे करण्यात आलेल्या या अभ्यासात, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम (एनटीईपी) अंतर्गत वापरल्या जाणाऱ्या बेडाक्विलीन-आधारित उपचार - बीपॅल (बेडाक्विलीन, प्रीटोमॅनिड आणि लाइनझोलिड) आणि बीपॅलएम (मॉक्सिफ्लोक्सासिनसह) - आर्थिकदृष्ट्या कसे परडवडू शकतात याचे मूल्यमापन करण्यात आले.

बीपॅल उपचार अधिक प्रभावी आणि किफायतशीर असल्याचे विश्लेषणाअंती दिसून आले. प्रत्येक अतिरिक्त गुणवत्ता-समायोजित जीवन वर्षात (क्यूएएलवाय), आरोग्य प्रणाली मानक उपचारांच्या तुलनेत प्रति रुग्ण खर्च 379 रुपयांनी कमी होऊन फायदा झाल्याने कमी खर्चात आरोग्यावर चांगला परिणाम होत असल्याचे दिसून येते.

BPaLM उपचारपद्धती देखील अत्यंत किफायतशीर असल्याचे आढळले, मानक उपचारपद्धतीच्या तुलनेत प्रत्येक रुग्णासाठी प्रत्येक अतिरिक्त क्यूयुएएलवाय (Quality-Adjusted Life Year) मिळवण्यासाठी फक्त 37 रुपये इतका अतिरिक्त खर्च झाला. औषधे, रुग्णालयात जाणे आणि फॉलो-अप देखभाल या एकूण आरोग्यसेवांचा खर्च दोन्ही उपचारपद्धतींशी संबंधित कमी किंवा तुलनात्मक होता.

बहु-औषध प्रतिरोधी/ आरआर-क्षयरोग हा दीर्घकाळ उपचार कालावधी, प्रतिकूल परिणाम आणि जास्त खर्च यामुळे उपचारांमध्ये  मोठे आव्हान उभे करतो. कमी काळासाठी घ्याव्या लागणाऱ्या सर्व-मौखिक उपचारपद्धतींमुळे रुग्णांवर उपचार करणे सोपे होते, रुग्णाचे आजारपण कमी होते आणि ते सामान्य जीवनात जलद परत येऊ शकतात, पर्यायाने आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताणही कमी होतो. भारतातील एमडीआर/आरआर-क्षयरोग व्यवस्थापनासाठी लहान, सर्व-मौखिक पद्धतींच्या वापरास समर्थन देण्यासाठी हे निष्कर्ष महत्त्वाचे आर्थिक पुरावे प्रदान करतात. उपचारांचा कालावधी 9–18 महिने किंवा त्याहून अधिक काळ कमी करून सहा महिन्यांपर्यंत आणून, ही उपचारपद्धती संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याच्या राष्ट्रीय प्राधान्यांशी सुसंगत ठरते आणि क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने वेगाने प्रगती करण्यासाठी सहाय्यभूत ठरते.

या अभ्यासातून असा निष्कर्ष निघतो की BPaL-आधारित उपचारपद्धती संभाव्यतः खर्चात बचत करणाऱ्या किंवा कमी खर्चिक आहेत आणि राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत भारतातील औषध-प्रतिरोधक क्षयरोगाविरुद्धच्या प्रतिसादाला बळकटी देण्यासाठी या उपचारपद्धती  स्वीकारल्या जाऊ शकतात.

संपूर्ण अभ्यास येथे पाहता येईल: https://ijmr.org.in/cost-effectiveness.pdf

 

* * *

नितीन फुल्लुके/मंजिरी गानू/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2226985) अभ्यागत कक्ष : 19