वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
जर्मनी येथे झालेल्या बायोफॅक 2026 मध्ये भारताला वर्षातील सर्वोत्तम देश म्हणून घोषित करण्यात आले
Posted On:
10 FEB 2026 5:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी 2026
जर्मनी मध्ये नुरिमबर्ग येथे 10 ते 13 फेब्रुवारी दरम्यान आयोजित, बायोफॅक 2026 या सेंद्रिय उत्पादनांसाठीच्या जगातील अग्रणी व्यापार प्रदर्शनात भारताला वर्षातील सर्वोत्तम देश म्हणून घोषित करण्यात आले आहे.
बायोफॅक 2026 मधील भारताचा सहभाग केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा) ने आयोजित केला असून यामध्ये भारताचा प्रमुख आणि उच्च प्रभाव साधणारा सहभाग दिसून येईल.
भारताच्या सहभागामुळे देशाचा समृद्ध कृषी वारसा अधोरेखित होईल आणि सेंद्रिय उत्पादनांचा एक जागतिक वितरक म्हणून भारताचे सामर्थ्य दिसून येईल.
बायोफॅक जर्मनी हे जगातील सर्वात मोठी आणि प्रभावशाली प्रदर्शन असून ते केवळ सेंद्रिय अन्न आणि कृषिउत्पादनांसाठी समर्पित आहे.बायोफॅक 2026 मध्ये भारताचा सहभाग याआधीच्या आवृत्तीच्या तुलनेत अधिक मोठ्या प्रमाणावर असेल, ज्यामधून भारतीय सेंद्रिय उत्पादनांची दिवसेंदिवस वाढणारी निर्यात, सेंद्रिय उत्पादनांची जागतिक स्तरावर वाढणारी मागणी, निर्यातदार, संस्था आणि शेतकरी उत्पादक संघटना (FPO) यांच्या वाढत्या सहभागाचे प्रतिबिंब दिसते.
14 वर्षांच्या कालावधीनंतर, भारतातील सेंद्रिय शेती क्षेत्र पुन्हा एकदा बायोफॅक 2026 मध्ये केंद्रस्थानी येण्यास सज्ज आहे.
अपेडाद्वारे स्थापन करण्यात आलेला इंडिया कंट्री पॅव्हेलियन 1,074 चौरस मीटर क्षेत्रफळाचा असेल आणि त्यात 67 सह-प्रदर्शक असतील, ज्यात सेंद्रिय उत्पादनांचे निर्यातदार, शेतकरी उत्पादक संघटना, सहकारी संस्था, सेंद्रिय प्रयोगशाळा, राज्य सरकारी संस्था आणि कमोडिटी बोर्ड यांचा समावेश असेल.
या दालनात तांदूळ, तेलबिया, औषधी वनस्पती, मसाले, डाळी, काजू, आले, हळद, मोठी वेलची, दालचिनी, आंबा प्युरी आणि आवश्यक तेले यासारख्या विविध प्रकारच्या सेंद्रिय उत्पादनांचे प्रदर्शन केले जाईल.
20 पेक्षा अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील निर्यातदार या भारतीय पॅव्हेलियन मध्ये भाग घेत असून यातून देशाच्या वैविध्यपूर्ण कृषिसंस्कृतीचे आणि प्रादेशिक विविधतेचे दर्शन घडते. शिवाय, भारतातील वारसा असलेल्या तांदळाच्या जातींची माहिती दूरवर पोहोचावी यादृष्टीने, इंद्रायणी तांदूळ, Navara rice, गोविंदभोग तांदूळ, लाल तांदूळ आणि चक हाओ (काळा तांदूळ) या पाच जीआय-टॅग केलेल्या तांदळाच्या जाती पर्यटकांना दिल्या जातील.
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2225970)
अभ्यागत कक्ष : 8