पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची अमर्याद क्षमता अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित आणि 'परीक्षा पे चर्चा'चा उद्देश केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
09 FEB 2026 9:06AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, आपले विद्यार्थी असामान्य प्रतिभेने संपन्न आहेत आणि त्यांच्यामध्ये आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यांनी नमूद केले की, परीक्षा पे चर्चाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांचा वैयक्तिक वाढ आणि यशासाठी अर्थपूर्ण वापर कसा करावा, यावर मार्गदर्शन करणे हा आहे.
या निमित्ताने पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. -
“विद्या वितर्को विज्ञानं स्मृतिस्तत्परता क्रिया। यस्यैते षड्गुणास्तस्य नासाध्यमतिवर्तते॥”
या सुभाषितामधून हा संदेश देण्यात आला आहे की, ज्या व्यक्तीकडे ज्ञान, तर्क, विज्ञान, स्मृती, तत्परता आणि कृतीशीलता आहे, ती व्यक्ती कोणत्याही आव्हानावर मात करू शकते आणि अशा व्यक्तीसाठी काहीही अशक्य नसते.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिलेः
“अद्भुत प्रतिभेने संपन्न असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांची स्वप्ने साकार करण्याची पूर्ण क्षमता आहे. 'परीक्षा पे चर्चा'चा उद्देश देखील हाच आहे की, ते त्यांच्या प्रतिभा आणि कौशल्याचा सार्थक वापर कसा करू शकतात.
विद्या वितर्को विज्ञानं स्मृतिस्तत्परता क्रिया।
यस्यैते षड्गुणास्तस्य नासाध्यमतिवर्तते॥”
***
NehaKulkarni / DhaileshPatil / DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2225278)
आगंतुक पटल : 84
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Bengali
,
Bengali-TR
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam