इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री  अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते बेंगळुरू येथे 'झेटवर्क इलेक्ट्रॉनिक्स'च्या जागतिक दर्जाच्या संरक्षण, ऑटोमोटिव्ह आणि आयटी हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्राचे उद्घाटन

प्रविष्टि तिथि: 07 FEB 2026 10:45PM by PIB Mumbai

 

रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री माननीय  अश्विनी वैष्णव आणि कर्नाटकचे मोठे आणि मध्यम उद्योग मंत्री एम.बी. पाटील यांनी आज बेंगळुरू येथे संरक्षण, ऑटोमोटिव्ह आणि आयटी हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक्ससाठी उभारलेल्या 'झेटवर्क इलेक्ट्रॉनिक्स'च्या नवीन जागतिक दर्जाच्या उत्पादन केंद्राचे उद्घाटन केले.

या कार्यक्रमामध्‍ये  केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केले की, येथे उत्पादित होणारे प्रत्येक उत्पादन उच्च दर्जाच्या मानकांची पूर्तता करेल. इलेक्ट्रॉनिक्स घटकांचे उत्पादन आता वेगाने वाढत असल्याचेही मंत्र्यांनी नमूद केले. विविध उद्योगांना  आधीच 46  मंजुऱ्या देण्यात आल्या आहेत आणि कर्नाटकला ₹10,000 कोटींहून अधिक गुंतवणूक मिळण्याची शक्यता आहे.

नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन योजनेसाठीची तरतूद ₹22,000 कोटींवरून वाढवून ₹40,000 कोटी केली आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचा प्रवास लक्षणीयरीत्या वेगवान होईल, अशी अपेक्षा अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केली.

येत्या 10 वर्षांत 85,000 सिलिकॉन इंजिनिअर्स तयार करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे आणि चार वर्षांत आम्ही आधीच 67,000 इंजिनिअर्सना प्रशिक्षित केले आहे. परिणामी, चिप डिझाइनचा एक मोठा भाग व्यावहारिकदृष्ट्या भारतातच साकारला जाईल. येत्या काही वर्षांत हा एक मोठा बदल ठरेल. भारताला 2047 पर्यंत 'विकसित भारत' बनवण्यासाठी संकुचित दृष्टिकोन न ठेवता व्यापक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. ते म्हणाले की, माननीय पंतप्रधानांनी आपल्याला ही दृष्टी दिली आहे आणि आपण सर्वांनी संघटितपणे त्या एकाच ध्येयावर लक्ष केंद्रित करून काम केले पाहिजे.

***

सुवर्णा बेडेकर/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2225135) आगंतुक पटल : 62
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Punjabi , Gujarati