उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आयसीसी विश्वचषक जिंकल्याबद्दल भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचे उपराष्ट्रपतींनी अभिनंदन केले

Posted On: 06 FEB 2026 9:22PM by PIB Mumbai

 

झिम्बाब्वेमध्ये हरारे येथे झालेल्या 19 वर्षाखालील आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्याबद्दल उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी भारताच्या युवा चॅम्पियन्सचे अभिनंदन केले आहे.

हा विजय खरोखरच ऐतिहासिक आहे, कारण भारताने विक्रमी सहाव्यांदा हा प्रतिष्ठित किताब जिंकला आहे, असे त्यांनी समाज माध्यम पोस्टमध्ये म्हटले आहे.

युवा स्टार वैभव सूर्यवंशीने केलेल्या विक्रमी खेळीबद्दल सी. पी. राधाकृष्णन यांनी विशेष प्रशंसा केली आहे, आणि कर्णधार आयुष म्हात्रे आणि संपूर्ण भारतीय संघाचे अभिनंदन करत, हा क्षण देशासाठी अभिमानास्पद असल्याचे म्हटले आहे.

***

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2224775) अभ्यागत कक्ष : 17